शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मंदिरे, प्रार्थना स्थळे पाडा - हायकोर्ट

By admin | Updated: January 10, 2015 02:25 IST

पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्मांची व पंथांची अनधिकृत मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे हटवा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासन व महापालिकांना दिले़

हातोडा : सरकार, पालिकांना दिले आदेशमुंबई : पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्मांची व पंथांची अनधिकृत मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे हटवा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासन व महापालिकांना दिले़न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ त्यानुसार येत्या चार आठवड्यांत प्रशासनाला ही कारवाई करायची असून, याची पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे़या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रियानी यांनी जनहित याचिका केली आहे़ ज्यांनी अवैध मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळे उभारली आहेत त्यांच्यावर कारवाई करून संबंधित जागेचे भाडे त्यांच्याकडून वसूल करावे़ यापुढे अशी अवैध मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळे उभारली जाणार नाहीत यासाठीदेखील उपाययोजना कराव्यात, असे याचिकेत म्हटले आहे़ महत्त्वाची अवैध मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळे पाडण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ तरीही शासन काहीच कारवाई करीत नाही़ पालिकेलाही अशी कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ त्यांनीही तुटपुंजी कारवाई केली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर कारवाई सुरू झाली़ मात्र अजूनही काही ठिकाणी अशी अवैध धार्मिक स्थळे असल्याचे, भगवानजी यांनी गुरुवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्राह्य धरत न्यायालयाने हे आदेश दिले़राज्यभरात १७ हजार बेकायदा मंदिरे व प्रार्थना स्थळे आहेत़ पदपथ व रस्त्याच्या कडेला ही अवैध मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळे उभारली गेली आहेत़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्रास होता़ आवाजाचे व हवेचे प्रदूषणही यामुळे होत असल्याने या अनधिकृत मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे़