शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बनावट नोटांची घुसखोरी बांगलादेशातून

By admin | Updated: August 5, 2014 00:59 IST

बनावट नोटांच्या प्रकरणात वर्धा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याला या नोटांचा पुरवठा बांगला

पश्चिम बंगालमधून नोटा विकणाऱ्याला अटक : टोळीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे आव्हान वर्धा : बनावट नोटांच्या प्रकरणात वर्धा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याला या नोटांचा पुरवठा बांगला देशातून होत असल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली आहे. बांगला देशात नोटांची छपाई करुन त्या भारतात पेरण्याचे काम मोठ्या टोळीच्या माध्यमातून होत असावे, असा पोलिसांना संशय आहे. मात्र या टोळीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अधिक माहितीसाठी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केलेल्या आरोपीला वर्धा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अब्दुल खालिक आबेद अली रा. सुलतान गंज, कालिया चौकी, माकद पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.२४ जुलै रोजी नागपूर एटीएस पथकाने वर्धा पोलिसांच्या सहकार्याने येथील रेल्वे स्थानक परिसरातील एका भोजनालयातून बॅगमध्ये दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेवून अमरावतीला जाण्याच्या बेतात असलेल्या शेख आसिफ शेख उस्मान (२२) रा. पुसद याला अटक केली. यानंतर मोहसीन खान वल्द मलान खान (२७) रा. हजरत उमल फारुख रा. पुसद व मोहम्मद इकबाल वल्द नूर हसन (४०) रा. गवळीपुरा मशिदपुरा अमरावती या दोघांना अटक करण्यात आली. या तिघांचीही कसून चौकशी केली असता पश्चिम बंगालमधून अब्दुल खालिक आबेद अली याच्याकडून ४५ हजारात एक लाख बनावट नोटा याप्रमाणे खरेदी केल्याची कबुली दिली होती. याआधारे वर्धा पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. मात्र त्याचा शोध पोलिसांना लागला नाही. पथकाने माघार न घेताच गावात सापळा रचून ठेवला. तो गावात आल्याची माहिती मिळताच रविवारी हे पथक तेथे पोहोचले. अखेर नोटा विकणाऱ्या अब्दुल खालिक आबेद अली याला मोठ्या शिताफीने अटक केली. झडती घेतली असता त्याच्याकडून पुन्हा दोन लाखांच्या नोटा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी दुपारी ४ वाजता पोलीस पथक आरोपीला घेऊन वर्धेत दाखल झाले. या नोटा त्याच्यापर्यंत बांगला देशातून पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. या कामात आंतराष्ट्रीय टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला या बनावट नोटा कोण पोहोचवितो. तो केव्हापासून नोटांची विक्री करीत आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान वर्धा पोलिसांपुढे असून त्या दिशेने तपास सुरू आहे. ही कारवाई ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)