शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धाकधूक, भीती अन् पेपर पडला हातात!

By admin | Updated: March 1, 2017 00:41 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेची मंगळवार (दि. २८) पासून सुरुवात झाली.

पिंपरी : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेची मंगळवार (दि. २८) पासून सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरात १७ परीक्षा केंद्रावर अंदाजे २१ हजार ६२ विद्यार्थी परीक्षेला बसले. बोर्ड परीक्षेच्या सुरुवातीस असणारा इंग्रजी विषयाचा पेपर शांततामय वातावरणात पार पडला. बारावीची बोर्ड परीक्षेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे अभ्यासाचे वातावरण आहे. मंगळवारी (दि. २८) इंग्रजी विषयाच्या पेपरने बारावी बोर्ड परीक्षेस सुरुवात झाली. वर्षभर केलेल्या अभ्यासाची कसोटी या परीक्षेला लागणार असल्याने साहजिकच पालक व विद्यार्थ्यांना वाटणारी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. ऐन परीक्षेवेळी कोणतीही गडबड होऊ नये. यासाठी जागरूक पालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशीच परीक्षा केंद्र व बैठक क्रमांकाची माहिती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना वेळेत व कोणत्याही अडचणीशिवाय केंद्रावर पोहोचण्ो शक्य झाले. बहुतांश केंद्रांवर नियोजित वेळेआधीच विद्यार्थी उपस्थित होते. यातील काही मुले एकट्याने तर काही गटाने अभ्यास (वाचन) करताना दिसली. तर काही गटांमध्ये विषयांबाबत चर्चा करताना दिसून आले. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, तसेच परीक्षा केंद्रावरील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी केंद्रांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. यासाठी परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था लिहिलेले फलक लावण्यात आले. केंद्रसंचालकांकडून विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. तर, काही केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधण्यात आला. उन्हाळ्याचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी वर्गाबाहेर पाण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी केंद्राने घेतल्याचे दिसून आले. मुख्य केंद्राचे प्रमुख एस.व्ही. देशपांडे म्हणाले, की बारावीची परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये अभ्यासाचे जादा तास घेत उजळणी घेण्यात आली असून, तणावमुक्त वातावरणात पेपर सोडविले जावेत, याकरिता विद्यार्थी व पालक यांना समुपदेशन करण्यात आले आहे. लोणावळा महाविद्यालयाचे संजय साळुंखे व डॉन बॉस्को हायस्कूलचे प्राचार्य क्रेसेन्स लेमोस हे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कोणतीही गडबड व गोंधळ न करता विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेल्याचे दिसून आले. या व्यतिरिक्त शहरात बारावीचा पेपर फुटल्याची चर्चा होत होती. परंतु पिंपरी-चिंचवड परिसरात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)>लोणावळा : १३६६ मुलांचा सहभागमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी लोणावळा केंद्रावर १३६६ विद्यार्थी बसले आहेत. व्हीपीएस हायस्कूल हे बारावीचे मुख्य केंद्र असून, लोणावळा महाविद्यालय व डॉन बॉस्को हायस्कूल ही दोन उपकेंद्रे आहेत. या तीन केंद्रांवर कला विभागाचे ३०० विद्यार्थी, वाणिज्य विभागाचे ८०१ विद्यार्थी व सायन्सचे २६५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. आज इंग्रजी या विषयाचा पेपर शांततेमध्ये पार पडला.