शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार!

By admin | Updated: April 6, 2017 02:07 IST

महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला

मुंबई : महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला आहे. याचे खापर अप्रत्यक्ष शिवसेनेवर फोडून भाजपा नेते नामनिराळे राहिले आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचे पहारेकरी सत्ताधारी शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहेत. वैधानिक समित्यांचा लेखाजोखा महापालिका प्रशासनाने दर तीन महिन्यांनी स्थायी समितीमध्ये मांडावा, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही कार्यअहवाल सादर करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. या संदर्भात पालिकेने निवेदन सादर केले. या निवेदनावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. कधीपासून लेखापरीक्षण कार्यअहवाल प्रलंबित आहे, याची माहिती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मागितली. तेव्हा गेल्या २२ वर्षांपासून परीक्षण कार्यअहवाल सादर न झाल्याचे समोर आले. आयुक्तांनी तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचा ठराव आहे. या ठरावानुसार २० वर्षे कार्यअहवाल सादर का केला नाही, इतकी वर्षे कार्यअहवाल विचारात न घेता, अर्थसंकल्प सादर कसा काय केला जातो? असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. गेली २१ वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. त्यामुळे लेख परीक्षण झाले नसल्यास सत्ताधारी अडचणीत येतील. मात्र, हा विषय स्वत: मांडून भाजपाने आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)।अन्यथा अर्थसंकल्पाला मंजुरी नाही आॅडिटसाठी टाळाटाळ करून जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार केला जात आहे.विकासाला खीळ बसली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन मिळून मुंबईचे नुकसान करत आहेत. कार्यअहवाल सादर न केल्यास अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे रवी राजा यांनी दिला. ।लढा पारदर्शकतेसाठीच...आमचा लढा हा पारदर्शकतेसाठी असून, आता आम्ही पहारेकरी म्हणून करीत आहोत. लेखा परीक्षण झाले नाही, हा प्रकार गंभीर आहे. जनतेच्या कराच्या रूपाने आलेल्या पैशाचा योग्य हिशेब ठेवलाच पाहिजे. याचा जाब विचारणारच, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपाचे मनोज कोटक यांनी शिवसेनेला दिला.तीन महिन्यांत मांडणार लेखाजोखापैशाचा विनियोग कसा करणार, १९९२ मध्ये काँग्रेसचा महापौर सोडला, तर गेली २५ वर्षे शिवसेनाच सत्तेवर आहे. त्यामुळे या प्रकाराला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. करदात्यांच्या पैशांचा हिशोब ठेवला जात नाही. शिवसेनेचे महापौर मिलिंद वैद्य यांच्या कार्यकाळापासून आॅडिट झालेले नाही.