शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीवरील निर्बंध हटले!

By admin | Updated: May 2, 2017 00:29 IST

वाशिम : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना दिलासा : वेळापत्रक जाहीर

वाशिम : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. विभागनिहाय आॅनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले असून, आॅनलाइन अर्ज केलेल्या पात्र शिक्षकांची उपलब्ध जागेनुसार आंतरजिल्हा बदली केली जाणार आहे.गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांना संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. विभागनिहाय अर्ज सादर करण्याचे वेळापत्रकही शासनाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ ते ३० एप्रिल दरम्यान पुणे, कोल्हापूर व मुंबई विभागातील इच्छूक शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. २ ते ४ मे दरम्यान नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील इच्छूक शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले तर अमरावती व नागपूर विभागातील इच्छूक शिक्षकांना ५ ते ७ मे या दरम्यान आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. तत्पूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना इच्छूक शिक्षकांच्या सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत कराव्या लागणार आहेत. या नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही अमरावती विभागात सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विहित मुदतीत त्या-त्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार अमरावती विभागातील इच्छूक शिक्षकांना ५ ते ७ मे या दरम्यान आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत.- दिनकर जुमनाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम.