शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

'मेपल'च्या सचिन अग्रवालला ८ जून पर्यंत अंतरिम जामीन

By admin | Updated: May 5, 2016 16:11 IST

स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवालला ८ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे. दि. ५ - स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवालला ८ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. १३ मे नंतर शनिवार आणि रविवारी हजेरी लावण्याचे आदेशही न्यायावयाने दिले आहेत. 
सचिन अग्रवाल यांनी आपल्या मॅपल ग्रुपतर्फे पुण्यात पाच लाखांत घर देण्याची योजना जाहीर केली होती. घरासाठी अर्ज करणाऱ्यांकडून ना परतावा स्वरूपात ११४५ रुपये रोख घेतले जात होते. सोडत गपद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या १० हजार लाभार्थ्यांना पाच लाखांत तर अन्य लोकांना सात लाख ते आठ लाखांत वन बीएचके घर देण्याची योजना मॅपल ग्रुपने जाहीर केली होती. मात्र ही योजना फसवी असल्याचा दावा करीत खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
 
या योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेशी काहीही संबंध नसल्याने ती त्वरित बंद करावी तसेच या प्रकरणाची म्हाडाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी असे आदेश महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेचे राज्य संचालक निर्मलकुमार देशमुख यांनी म्हाडास दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने मॅपल ग्रुपवर कारवाई आश्वासन देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच अर्जदारांचे पैसे परत करण्याचे आदेशही दिले होते. या प्रकरणात अद्याप सचिन अग्रवाल यांना अटक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांदेखत सचिन अग्रवाल पळून गेल्याने नवा वाद निर्माण झाला.