शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

असा सुरू झाला आंतरराष्ट्रीय योग दिन !

By admin | Updated: June 21, 2017 09:18 IST

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21- निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसंच आपल्या विचारांमध्ये पॉसिटीव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योगा करा असा सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो. इतकचं नाही, तर योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे. पण विशेष म्हणजे जगभरात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचं संपूर्ण श्रेय हे भारताला जातं.  भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असं जाणकार सांगतात. योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलली होती. 
 
 
नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती.  या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम कसे असताता या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली होती. 
 
"भारताला योगाची प्राचीन परंपरेपासून अमुल्य भेट मिळाली आहे.  माणसाचं मन, शरीर, विचार,कृती तसंच संयम या सगळ्यामध्ये एकाग्रता आणण्याचं काम योगा करतं. आरोग्य आणि कल्याणाकरिताचा वेगळा दृष्टीकोन योगातून मिळतो", अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडताना व्यक्त केली होती.  आपली जीवनशैली बदलायला आणि चैतन्य निर्माण करायला योगा चांगल्याप्रकारे मदत करू शकतो म्हणूनच आम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काम करू द्या, असंही मोदी सभेत म्हणाले होते.  
 
 
संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलांमध्ये ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या या महासभेत 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधी होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी उपस्थित होते.  संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.
 
 
- म्हणून 21 जून हा दिवस ठरला आंतरराष्ट्रीय योग दिन.
 
संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.  भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.