शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2018 : ...अन् ३ हजार कैदी झाले योगमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:36 IST

योगाच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव खात्रीने दूर होऊ शकतो, हे सूत्र विचारात घेऊन योग शिक्षक पवार यांनी अलिबाग येथील हिराकोट जिल्हा कारागृहातील कैद्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सन २००४ मध्ये केला.

- जयंत धुळप अलिबाग : योगाच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव खात्रीने दूर होऊ शकतो, हे सूत्र विचारात घेऊन योग शिक्षक पवार यांनी अलिबाग येथील हिराकोट जिल्हा कारागृहातील कैद्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सन २००४ मध्ये केला. ३ हजारांपेक्षा अधिक कैद्यांनी त्यांच्याकडून मोफत योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला.निकम गुरुजींनी १९६५ मध्ये सुरू केलेल्या अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून गेल्या ५३ वर्षांत लाखो नागरिकांनी योग आत्मसात करून, आपले आयुष्य सुखकर आणि निरोगी बनविले असल्याचे योग शिक्षक पवार यांनी सांगितले.>योग ही विनाखर्चीक उपचार पद्धतीआजच्या अत्यंत ताणतणावाच्या युगात मधुमेह, रक्तदाब, पाठदुखीसारखे आजार माणसाला जडतात आणि त्यांचा विपरित परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. या समस्येवर मात करण्याकरिता योग हा विनाखर्चाचा, आपल्याला आपल्या घरी वा आपण जेथे असू तेथे करता येऊ शकणार आणि खात्रीने प्रभावी उपाय असल्याचे पवार यांनी सांगितले.>योगातून बुद्धिमत्तेचा होतो विकासयोगाचे महत्त्व आणि सामर्थ्य शालेय जीवनातच विर्द्यांथ्यांना लक्षात आणून दिले, तर त्यांचा लाभ त्यांच्या बुद्धिमत्ता विकासाकरितादेखील होऊ शकतो, असा विचार डोक्यांत घेऊन, सन १९९९ पासून योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी यांनी आपल्या सहकार्यांच्या सहयोगातून, नागाव, हाशिवरे, चोंढी, रेवदंडा आदी ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकरीता योग प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले आहे. आजवर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हे योग प्रशिक्षण मोफत देण्यात आले आहे.>२१ वर्षांत पाच हजार अलिबागकर झाले योगमयतब्बल २१ वर्षांच्या या अलिबागमधील मोफत योग प्रशिक्षणवर्गाचा ६१वा वर्ग रविवारी त्याच नेहमीच्या उत्साहात सुरू झाला आहे. गेल्या २१ वर्षांच्या कालखंडात अलिबागमधील या मोफत योग प्रशिक्षण वर्गांतून पाच हजारपेक्षा अधिक स्त्री-पुरुष नागरिकांनी योग प्रशिक्षण घेऊन, आपले आयुष्य समृद्ध केले असल्याची माहिती अंबिका योग कुटीर अलिबाग शाखेचे प्रमुख व्रतस्थ योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.