शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस उत्साहात

By admin | Updated: August 10, 2014 00:22 IST

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते, 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

जव्हार : जव्हारमध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी, ए. आ. वि. प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते, 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी 9 वाजेपासून प्रकल्प कार्यालयातून, राजांच्या पुतळय़ार्पयत व तेथून परत प्रकल्प कार्यालय अशी मोठय़ा संख्येने विद्यार्थी व आदिवासी बांधवांनी भव्य  रॅली काढली. प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून यावर्षी शासकीय कार्यक्रम म्हणून आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमात वेगवेगळय़ा प्रांतातील आदिवासी अस्मिता जपणारे जगप्रसिद्ध झालेले डांगी नृत्य, तारपा नृत्य, सोहोंगी नृत्य, ढोलनाच, तुरनाच, घोच नाच इत्यादी आदिवासींची परंपरा व जीवन दर्शविणारी सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली होती. 
9 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. परंतु या दिवसाचे महत्त्व खेडय़ापाडय़ात तसेच डोंगरद:यात राहत असलेल्या आदिवासी समूहार्पयत पोहोचवणो आवश्यक आहे. 9 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व समजून घेतानाच आदिवासी समूहाच्या समस्या, त्यांची उच्च वैशिष्टय़पूर्ण संस्कृती, त्यांचे असलेले निसर्गाशी नातेसंबंध, त्यांची उच्च जीवनमूल्ये समजून घेणो आवश्यक आहे. 
आदिवासी संस्कृतीवर होणारे आक्रमण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे सामिलीकरणामुळे आदिवासी संस्कृती धोक्यात आली आहे.
 
4आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासी समूहाच्या हक्कासाठी असलेल्या संकेताची जाणीव त्यांना करून देणो, आपल्या हक्कासाठी त्यांच्यामध्ये जागृती करणो
4समूहामध्ये एकत्रितरित्या राहणो, समूह म्हणून आपले जीवन वुद्धींगत करणो, या सर्व बाबींची जाणीव त्यांना व्हावी. आपल्या  आत्मसन्मानाचा दिवस म्हणून हा साजरा व्हावा
4या उद्देशाने सर्वानी बहुसंख्येने एकत्र यावे व हा आत्मसन्मानाचा दिवस उत्स्फूर्तपणो साजरा व्हावा. यादृष्टीने सदरचा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
 
4डहाणू, पालघर, वसई, तलासरी भागातील हजारो आदिवासी विद्याथ्र्यानी तसेच नागरिकांनी डहाणूत रॅली, आदिवासी गीत तसेच तारपानृत्य करुन जागतिक आदिवासी दिन मोठय़ा थाटामाटात साजरा केला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने आज डहाणूत  एका भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
4सात तालुक्यांतील आo्रमशाळांतील विविध क्षेत्रत प्रावीण्य मिळविलेल्या विद्याथ्र्याना सुवर्ण तसेच रजत पदकांचे पारितोषिक देऊन राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आदिवासी समाजानेही शिक्षणाचे महत्व समजून घ्यावे.
 
4आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आदिवासी समाजाचा सर्वागीण विकास करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. असे सांगून 13क् आo्रमशाळांपैकी 88 आo्रमशाळा बांधायला सुरुवात होणार असून हे सर्व सरकारच्या मालकीचे असणार आहे. आरक्षणाचा वाटा कोणीही घेऊ नये.
 
आदिवासींच्या आधिकारावर घाला घालण्याचा प्रयत्न सतत होत असून आदिवासींच्या नोक-या बिगर आदिवासी बळकावत आहेत. त्यातच आता धनगर समाजासह अन्य समाजही आदिवासी दिनाच्या निमित्ताने  दहा ते बारा हजार मोर्चेकरांनी आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शनिवारी पालघरच्या चार रस्त्यावरुन आदिवासी  विविध पक्षांच्या कार्यकत्र्यानी भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच मोर्चेक:यांनी धडक दिली.  यावेळी जिल्हाधिकरी अभिजीत बांगर यांना  निवेदन दिले.
जिल्ह्याचे केलेले विभाजन हे बेकायदेशीर व बेजबाबदार कृत्य असून अनुसूचित क्षेत्रतील आदिवासी समूहावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मुख्यालय सोयीचे व्हावे म्हणून मध्यवर्ती ठिकाणी असावे. जागतिक आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी.