शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय रक्तचंदन तस्करांचा विळखा

By admin | Updated: February 28, 2017 04:47 IST

जेएनपीटी बंदरात गेल्या १० वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत

मधुकर ठाकूर,उरण- जेएनपीटी बंदरात गेल्या १० वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे बंदर संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील १० वर्षांत विविध ठिकाणी आणि काही कंटेनर गोदामावर धाडी टाकून एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अब्जावधी रुपये आहे. या विविध प्रकरणांत काही आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप तरी तपास यंत्रणेचे हात पोहोचलेले दिसत नाहीत. परिणामी, मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याने रक्तचंदनाची जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहे.जेएनपीटी बंदरातून शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ, सापाची कातडी यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. आठ वर्षांपासून या तस्करीमध्ये रक्तचंदनाची भर पडली आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. देशात या दुर्मीळ रक्तचंदनाच्या एका किलोची किंमत साधारणत: ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. तर परदेशात रक्तचंदन १५० ते २०० डॉलर प्रति किलोच्या भावाने विकले जाते.