शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांतून घडताहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू

By admin | Updated: August 3, 2016 02:41 IST

महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही खो - खोसह मॅरेथॉनमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू लागले आहेत.

नवी मुंबई : महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही खो - खोसह मॅरेथॉनमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्येही या खेळाडूंचा सराव थांबू नये यासाठी राबाडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयामध्ये इनडोअर स्टेडियम तयार केले आहे. रविवारीही खेळाडूंसाठी शाळा सुरू ठेवली जात आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने गोल्ड मेडल मिळविले. यामध्ये महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यालयामध्ये सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अश्विनी प्रभाकर मोरे या खेळाडूची कामगिरीही महत्त्वाची ठरली. राबाडा येथील निब्बाण टेकडी झोपडपट्टीत राहणारी ही विद्यार्थिनी जिद्द व मेहनतीच्या बळावर देशपातळीवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. याशिवाय राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांमध्येही यश मिळवत आहे. अश्विनीप्रमाणे पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे निकिता धुमाळ, कांचन हलंगरे, शीतल ओहाळ, साधना गायकवाड, आरती काटे, रोहित काटे या खेळाडूंनी महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्याच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. काटे, संकेत जाधव, सुफियान शेख, ऋषिकेश गायकवाड व इतर अनेक खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या या विद्यार्थ्यांना महापालिकेने व्यासपीठ मिळवून दिले आहे. महापालिका शाळेतील खेळाडूंचे प्रशिक्षण पावसाळ्यात थांबू नये यासाठी राबाडा शाळेत खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे खो - खोसाठी इनडोअर स्टेडियम तयार केले आहे. याशिवाय इमारतीची रचना मॅरेथॉनचा सराव करणाऱ्या मुलांना उपयोगी होईल अशी केली आहे. याशिवाय राज्यस्तरावर खो-खो खेळणाऱ्या अनुराधा कामठे, श्रद्धा फटाळे व इतर खेळाडूही याच शाळेत प्रशिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर अंतर पायी किंवा सायकलवरून येवून खेळाचा सराव करत आहेत. ठाणे, मुंबई, रायगड परिसरातील मॅरेथॉन स्पर्धेमध्येही हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. (प्रतिनिधी)>महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. दहा वर्षांपासून राजर्षी शाहू विद्यालयामध्ये खेळांवर विशेष लक्ष दिले जात असल्यामुळे येथील मुले खो -खो व मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. - सुधाकर सोनावणे, महापौर