शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अहिंसा व शांतीसाठी महिलांची आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 20:08 IST

देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता तर सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश भरडले जात आहेत.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 28 - संपूर्ण जग हे आज अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभे असून यात देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता तर सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश भरडले जात आहेत. धर्म, जात, आर्थिक विषमता, पर्यावरण आदी सर्वच घटकात तिरस्कार आणि हिंसेच्या राजकारणाला सामान्य बळी पडत आहेत. युगानयुगापासून ही अस्वस्थता सहन करूनही स्वतःसह परिवाराला सावरून धरणाऱ्या नारीशक्तीने सहिष्णुता व अहिंसेला कधी दूर सारले नाही. आजच्या जगाला आवश्यक असलेल्या सहिष्णुता व अहिंसेच्या विचार व वर्तनाला भक्कम करण्याच्या उद्देशाने गांधी तीर्थ जैन हिल्स येथे 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स अण्ड पीस मदुराई यांच्या संयुक्तविद्यमाने होणाऱ्या या परिषदेत 35 देशांतील सुमारे 200 महिला प्रतिनिधी सहभागी होत आहेत.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर या परिषदेचे उद्घाटन श्रीमती कृष्णमल जगन्नाथन यांच्याहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या जिल कार-हॅरिस, विश्वस्त दलिचंद जैन, जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित राहतील.