शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२६ नोव्हेंबरपर्यंत ‘त्या’ चौघांना अंतरिम दिलासा

By admin | Updated: November 24, 2015 02:49 IST

परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

मुंबई : परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. या दरम्यान चौघांनाही राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमावारी दिले. ठाण्याचे बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल ठाण्याचे काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अटक होईल, या भीतीने काही दिवस हे चौघेही भूमिगत होते. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुटीकालीन खंडपीठाने ३ नोव्हेंबरला चौघांनाही अंतरिम दिलासा देत सरकारला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी न्या. गडकरी यांच्यापुढे सरकारचे उत्तर दाखल केले. या चौघांवरील गुन्हाची पोलीस चौकशी करणे आवश्यक आहे. ते पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यावर न्या. गडकरी यांनी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याचे निर्देश देत २६ नोव्हेंबरपर्यंत या चौघांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)