शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-कोल्हापूरसाठी इंटरसिटी एक्स्प्रेस

By admin | Updated: March 26, 2017 02:49 IST

पुणे-कोल्हापूर अशी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केली

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर अशी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केली. त्याचबरोबर कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी २५० कोटी मंजूर केले असून, त्याच्या पायाभरणीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.कोल्हापुरातील राजर्षी शाहू टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात शनिवारी दुपारी पुणे-दौंड-बारामती विभागात डीईएमयू सेवेसह राज्यातील रेल्वेच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आला.महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रकाश हुक्केरी आदी यावेळी उपस्थित होते.सुरेश प्रभू म्हणाले, की गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वे तोट्याच्या दृष्टचक्रात अडकली होती. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व माझ्याकडे रेल्वे मंत्रालय सोपविल्यानंतर आम्ही हळूहळू मार्गक्रमण करीत अनेक छोट्या शहरांना रेल्वेच्या माध्यमातून जोडले. त्यातून विकासाचे चक्र गतीने फिरू लागले. ८ हजार ५०० कोटींचा विकास कार्यक्रम जाहीर केला. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख ३६ कोटींचा निधी मिळाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी रेल्वेची विकास कामे मार्गी लागतील. (प्रतिनिधी)रेल्वेचा खर्च कमी व उत्पन्नवाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यंदा ४००० कोटींची बचत करण्यात आली असून, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्यात आला आहे. येत्या दहा वर्षांत ४१ हजार कोटींची बचत करण्याचे नियोजन आहे.- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री.