शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 01:36 IST

अजब तर्क : कोकणातील जनतेमध्ये विधानामुळे रोष

रायगड : ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे झालेल्या वादळाची तीव्रता कोकणातील वादळापेक्षा अधिक आहे, असा अजब तर्क विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लावला. दरेकर यांच्या विधानामुळे कोकणातील जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त जिल्ह्याची पाहणी करुन पुनर्वसनाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निसर्ग चक्रीवादळातील मदत जाहीर होण्यास उशीर झाल्याबाबत कबूली दिली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी मागणी केल्यामुळे केंद्रीय पथक आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवीण दरेकर यांनी एनडीआरएफचा निधी केंद्राचाच आहे. केंद्राकडून एक फुटकी कवडीची देखील मदत नाही या खासदार सुनील तटकरे यांच्या टीकेला दरेकर यांनी उत्तर दिले. केंद्र सरकार मोठा गोष्टींमध्ये मदत करीत असते, लहान गोष्टीं जिल्हा पातळीवर तसेच राज्यपातळीवरुन काम करायला हवे असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले. ओरीसा, पश्चिम बंगाल येथील वादळग्रस्तांना तातडीने निधी दिला जातो याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच ओडिशाच्या तुलनेत या चक्रीवादळाचा प्रभाव कमी असल्याचा अजब तर्क लावला. यामुळे पत्रकार देखील अवाक झाले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळOdishaओदिशा