शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन : आणखी एकास अटक

By admin | Updated: January 14, 2015 00:44 IST

संशयित न्यायालयीन कोठडीत : गावडे आंबेरेतही झडती घेतल्याचे तपासात उघड

रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी येथे अभ्यंकर यांच्या घरातील देव्हाऱ्याखाली गडगंज पैसे व सोने असा ८५ कोटी रुपयांचे गुप्तधन असल्याच्या संशयावरुन ओंकार अभ्यंकर यांच्या घरात झडती नाटक करणाऱ्या आरोपींनी हा प्रकार करण्याआधी गावडे आंबेरे येथील प्रदीप अभ्यंकर यांच्या घराची झडती घेतली होती. मात्र, त्यांना हवे असलेले अभ्यंकर गावडे आंबेरेतील नाहीत, असे लक्षात येताच याच आरोपींनी आपला मोर्चा मेर्वी गावाकडे वळविला, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिसांनी आणखी एक संशयित प्रकाश शंकर इंगळे याला इचलकरंजी येथे काल, सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता अटक केली. त्याला आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणातील आणखी दोघेजण फरार असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पूर्णगड पोलिसांनी सांगितले. मेर्वीतील ओंकार अभ्यंकर यांच्या घरात दाभोळकर हत्याप्रकरणी तपासासाठी आलो असल्याचे सांगत ज्या सुमारे पंधराजणांनी धुडगूस घातला होता, त्यांना घरातील देव्हाऱ्याखाली काहीच सापडले नाही. त्यांना जी माहिती मिळाली होती ती केवळ अफवाच होती. याप्रकरणी प्रथम ज्या सहाजणांना अटक करण्यात आली त्यामध्ये समीर सुभाष खेतल (वय ३०, देवरुख-नेहरूनगर, सोळजाई मंदिराजवळ, ता. संगमेश्वर), पुंडलिक कृष्णा जाधव (५६, रा. सांगली नाका, आर.के.नगर, इचलकरंजी), सुभाष शिवराम गमरे (४२, परेल), धर्मराज जयराम म्हामुलकर (जयसिंगपूर, कोल्हापूर), सचिन जयराम कांबळे (३३, देवरुख) सुरेश जगन्नाथ खोत (शाहूवाडी, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मेर्वीतील अभ्यंकरांच्या घराची झडती घेण्याआधाी या पंधराजणांनी गावडे आंबेरे गावातील प्रदीप अभ्यंकर यांच्या घरात घुसून झडती घेतली होती. आपल्याला हवे असलेले अभ्यंकर वेगळे आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथून मेर्वी गाठली, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले. (प्रतिनिधी)खेतल हाच मास्टरमाइंडयाप्रकरणी अटक केलेल्या पहिल्या सहाजणांमधील समीर खेतल हा या सर्व प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असून, अन्य सर्वांनी त्याला याप्रकरणात पैसे व सोन्याचे दागिने यांच्या हव्यासापोटी साथ दिली. तक्रारीत अभ्यंकर यांनी ज्या गाड्यांचे नंबर्स दिले होते त्याची खातरजमा केल्यानंतर संशयित आरोपींच्या त्या गाड्या असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कुंभार यांनी दिली. माहितीमागे नेमके कोण?अभ्यंकर यांच्या घरात देव्हाऱ्याखाली गडगंज संपत्ती लपवली असल्याची माहिती या संशयित आरोपींना दिली कोणी, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे. संपत्ती लपवून ठेवल्याची ही माहिती या संशयितांना कोणी मांत्रिक, तांत्रिकाने तर दिली नाही ना, अशी चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे ही माहिती संशयितांनादिली कोणी, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोरआहे.बनावट पोलिसांचा बहाणा करून मेर्वीतील अभ्यंकर यांच्या घराची झडती घेतल्याप्रकरणी अटक झालेल्यांमध्ये इचलकरंजी येथील शिवसेनेचे माजी कोल्हापूर जिल्हाप्रमुख् पुंडलिक कृष्णा जाधव याचा समावेश आहे. पुंडलिक जाधव यांनी शिवसेनेकडून इचलकरंजी लोकसभा व शिरोळ विधानसभा निवडणूकही लढविली होती.युती सरकारच्या काळात त्यांनी यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत.