शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासाठी एकात्मिक योजना- सुरेश प्रभू

By admin | Updated: June 4, 2017 14:25 IST

मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 4 - मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू आहे. मराठवाड्यासाठी एकात्मिक योजना तयार करीत आहोत. यातून मराठवाडा रेल्वे मार्गांनी विविध शहरांशी जोडण्यासह प्रलंबबित प्रश्न सुटतील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले.विविध कार्यक्रमांनिमित्त शनिवारी (दि.३) शहरात दाखल झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी खा. रावसाहेब दानवे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे, शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की, निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आपत्ती कोसळते. ही आपत्ती टाळण्यासाठी देशात प्रथमच विमा योजना तयार करण्यात आली. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, यादृष्टीने विविध स्वरूपांतील कामांना सुरुवात झाली आहे. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा, चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी काम करण्यात येत असल्याचे सांगत प्रभूंनी शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे यांच्यातर्फे संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यातून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या वतीने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गाचे ककाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कन्नड घाटात बोगदा तयार करण्यात येत आहे. याच बोगद्यातून दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग नेण्याची मागणी होत आहे. जमिनीचा प्रश्न सुटणार असल्याने याचा विचार करण्यात येईल. देशातील नदी जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले.३ लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूकरेल्वेच्या क्षेत्रात तीन वर्षांत ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक क रण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या बाहेर जाऊन ही गुंतवणूक होत आहे. प्रत्येक दिवशी रेल्वे रूळ निर्माण करण्यात अडीच पट वाढ झाली आहे. आगामी दहा वर्षांत ४१ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विजेची बचत केली जाणार आहे. उद्याची गरज लक्षात घेऊन आजच गुंतवणूक करीत असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. दमरेची पॅचवर्क सारखी स्थितीगेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मध्य रेल्वेतील नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडण्याची मागणी होत आहे. पूर्वी तीन ते चार विभाग होते; परंतु नंतर वाढत गेले. परिणामी, पॅचवर्कसारखी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी योग्य आहे. याचा परिणाम संपूर्ण देशातील झोनवर होईल. त्यामुळे हे क से करता येईल, यासंदर्भात काम सुरू असल्याचे प्रभू म्हणाले.