शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

मुंबई-गोवा बोट वाहतुकीसाठी आवश्यक ‘त्या’ सूचना

By admin | Updated: January 13, 2017 00:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक : मेरीटाईम बोर्ड, बंदर विभागाला एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे

कोल्हापूर : सौर ऊर्जेच्या वापराद्वारे प्रतिभानगरमधील निवृत्त धातुशास्त्र अभियंता श्रीराम पोतनीस यांनी महिन्याकाठी त्यांना येणारे सुमारे सात हजार रुपयांचे वीज बिल अवघ्या ५० रुपयांवर आणले आहे. सौर ऊर्जेद्वारे तयार झालेल्या विजेच्या वापरासह ती पुन्हा ‘महावितरण’ला देत आहेत.विजेच्या बिलाच्या बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर पोतनीस यांनी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पायोनियर एनर्जीच्या मदतीने तीन किलोवॅटचा सोलर पॉवर जनरेशन नेट मिटरिंगसह असलेला प्रकल्प त्यांनी स्वत:च्या बंगल्यावर कार्यान्वित केला. सोलर इन्व्हर्टर बसविला आहे. त्यात सूर्यप्रकाशापासून रोज विद्युत निर्मिती होते. घरातील विविध विद्युत उपकरणांसाठी वापर करून शिल्लक राहिलेली वीज ते ‘नेट मीटर’द्वारे ‘महावितरण’ला परत देत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यान्वित असलेल्या संबंधित प्रकल्पाचे गुरुवारी ‘महावितरण’च्या कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील माने, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रावसाहेब चव्हाण, पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी, आॅटोबॅटचे हनुमंत रेड्डी, के. सोलरचे सुनील सिन्नरकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शून्य युनिट वापरवाढणाऱ्या वीज बिलाला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे श्रीराम पोतनीस यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकल्पामुळे आम्ही जितकी वीज वापरली, तितकीच ‘महावितरण’ला परत दिल्यामुळे नोव्हेंबरमधील विजेचा वापर शून्य युनिट झाला आहे. त्यामुळे दरमहा नियमितपणे सुमारे सात हजार रुपयांपर्यंत येणारे वीज बिल नोव्हेंबरमध्ये अवघे ५० रुपये आले आहे. या बिलामध्ये स्थिर आकाराचा समावेश आहे.किमान २५ वर्षे विजेची बचतया प्रकल्पामुळे पुढील किमान २५ वर्षे पोतनीस यांना नगण्य वीज बिल येईल. त्यातून विजेची बचत होणार असल्याचे ‘पायोनियर एनर्जी’चे महेश कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकल्पामध्ये ‘महावितरण’चे मीटर, नेट मीटर आणि सोलर मीटर कार्यान्वित केले आहे. त्यातील नेट मीटरद्वारे ‘महावितरण’कडून आलेली वीज, त्यांना पोतनीस यांनी परत केलेली वीज, आदींची अद्ययावत माहिती मिळते. त्यात सोलर इन्व्हर्टर कार्यान्वित केला आहे. त्याद्वारे सौरऊर्जेतून निर्मिती झालेल्या विजेच्या युनिटची माहिती मोबाईल, लॅपटॉपवर संदेशाद्वारे मिळते. यासाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला आहे.कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील श्रीराम पोतनीस यांच्या निवासस्थानी सोलर पॉवर जनरेशन नेट मीटरिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे.