शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थानकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 01:22 IST

भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत.

भोर : भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यात झाडे उगवली असून, पुलावरून गाडी गेल्यावर पूल हलतो. या पुलावरून चारचाकी गाडी पडून झालेल्या अपघातात चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. महाड-पंढरपूर रस्त्यावरील आंबेघर येथील नीरा नदीवर संस्थानकाळात हा दगडी पूल १९३५ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यावर राज्यमार्ग असून, कोकणात जाणारा हा एकमेव मार्ग आहे.नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोड व महाड रोडवरील दोन्ही बाजूंकडील लोक याच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनांची सतत गर्दी असते. पुलाच्या बांधकामानंतर ८० वर्षांत कोणत्याच प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.त्यामुळे पुलाचे सरंक्षक कठडे तुटलेले असून, दगडी पिलर खराब झाले आहेत. पुलावरून वाहने गेल्यावर पूल थरथरतो. कठडे खराब असल्याने गेल्या वर्षी पहाटे चारचाकी गाडी पुलाववरून नदीपात्रातील पाण्यात पडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी केली; मात्र चारचाकी ज्या ठिकाणावरून पडली तेथे संरक्षक कठडे न बसवता इतर ठिकाणी कठडे बसविले. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो. ( वार्ताहर)