शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

संपूर्ण शेगाव विकासाची जबाबदारी घेण्यास संस्थानचा नकार

By admin | Updated: August 8, 2014 01:06 IST

संत गजानन महाराज संस्थानने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण शेगावच्या विकासाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : ६६ कोटी रुपयांचे योगदान देण्यास असहमतनागपूर : संत गजानन महाराज संस्थानने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण शेगावच्या विकासाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.शासनाने गेल्या १६ जुलै रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून शेगावच्या विकासकामासाठी संस्थानवर ६५ कोटी ५० लाख रुपयांचे योगदान निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली होती. यावर संस्थानने प्रत्युत्तर सादर करून ही रक्कम देण्यास असहमती दर्शविली आहे. भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. संपूर्ण शेगावचा विकास करणे संस्थानची जबाबदारी नाही, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. बाळापूर रोडवर ‘आनंद विहार’ नावाने ९०० खोल्यांची इमारत उभारण्यात येत आहे. गेल्या ४ वर्षांत ३० कोटी रुपये खर्च करून ७५० खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीमुळे रोज ३ हजार भाविकांची राहण्याची व १५०० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे.‘विसावा’ इमारतीतही तीन हजार भाविक राहू शकतात व ५०० वाहने पार्क करता येतात. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नगर परिषदेला ७ कोटी ७५ लाख रुपये दिले आहेत. तसेच, मंदिरालगतच्या मातंग वस्तीच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपये दिले आहेत. परंतु, म्हाडाने घरांचे बांधकामच सुरू केलेले नाही. म्हाडाचे अधिकारी बैठकीत अनुपस्थित असतात. म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे. अन्यथा बांधकामाचा खर्च वाढून भाविकांची देणगी व्यर्थ जाईल, याकडे संस्थानने लक्ष वेधले आहे.संस्थानने स्वत:च्या परिसरात ५० कोटींवर रुपयांची कामे केली आहेत. संस्थानतर्फे संचालित होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदिक औषधालयांवर दरवर्षी एक कोटी रुपये खर्च होतो. वाहतूक व्यवस्थेवर दरवर्षी दोन कोटी रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या ६ जुलै रोजी शासनाला पत्र लिहून खालवाडी येथील १० एकरावरील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली आहे. चार एकरात नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे व सहा एकर जमीन संस्थानला विकासाकरिता देण्यात यावी. या ठिकाणी संस्थान स्व:खर्चाने बहुमजली पार्किंग इमारत व भक्त निवास बांधण्यास तयार आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालयीन मित्र आहेत. (प्रतिनिधी)