शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारे हात - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 10, 2017 05:18 IST

भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली

मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल सुरुच असून, अंधेरी येथे गुरुवारी रात्री झालेल्या सभेत उद्धव यांनी भाजपाला पुन्हा टीकेचे लक्ष्य केले. परिणामी उद्धव यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रत्युत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यावर काय बोलतात? याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.गिरगाव, भांडुप, मुलुंड, चांदिवली येथील सभा गाजवत उद्धव यांच्या तोफांचा मारा सुरुच आहे. भाजपाच्याही सभांतून सेनेला प्रत्युत्तर दिले जाते आहे. परिणामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये रंगलेली जुगलबंदी आणखीच वाढत आहे. अंधेरी येथील सभेत विशाल समुदायाला उद्देशून उद्धव म्हणाले, भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करते. भाजपवर टीका करताना मुंबईकरांना मान खाली घालायला लावेल, असे एकही काम शिवसेनेने केलेले नाही. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात महापालिकेतील कामांचा उल्लेख केला आहे, बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख मुद्दाम केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘चिक्की किती आणि कोण खातंय हे लोकांना कळू द्या...’ असे म्हणत अप्रत्यक्षरित्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.भाजपवर टीका करतानाच उद्धव यांनी युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता, असेही वक्तव्य करत गुंडांना पक्ष प्रवेश देणाऱ्या भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांविरोधात शिवसेना सदैव उभी असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या अंधेरीतील भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी रत्नागिरी येथे अपघातात मृत्यू झालेल्या सात शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.