शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेसाठी तातडीने हालचाली

By admin | Updated: January 17, 2017 02:05 IST

वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी आगार प्रशासनाला जाग आली.

नेहरूनगर : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी आगार प्रशासनाला जाग आली. लोकमतने आगाराच्या आवारातील सुरक्षिततेबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर तेथील दक्षतेबाबत उपाययोजना करण्यासंबंधी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. शहरातील वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगाराच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडा-झुडपांचा आधार घेत एका नराधमाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास १९ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर लोकमतने आगाराच्या ठिकाणची परिस्थिती विशद करणारे वृत्त प्रसिद्ध केले. आगाराच्या आवारातील जागोजागीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठीचे पोलीस मदत केंद्र कधी सुरू, तर कधी बंद असते. अनेक नादुरुस्त एसटी बस आगारात पडून आहेत, आगार असुरक्षित बनले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या पथकाने आगारातील अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. संत तुकारामनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, सहायक वाहतूक निरीक्षक मच्छिंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत, रूपाली कुलथे, हवालदार राजेंद्र मारणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)