शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 9, 2017 03:24 IST

पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील प्रभागांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली. यावेळी नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्यास घेराव घातला. उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यास नगरसेविका प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, सुनीता पाटील, दमयंती वझे, जालिंदर पाटील, विनोद काळण, रविना माळी, शैलजा भोईर, मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे आदी नगरसेवकांनी एमआयडीसीच्या कार्यालयास धडक दिली. पाणी कमी दाबाने येत असल्याचा जाब विचारत त्यांनी कार्यकारी अभियंते एस. एस. ननावरे यांना घेराव घातला. उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, २७ गावांना एमआयडीसीकडून यापूर्वी दररोज ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने २७ गावांचा पाण्याचा कोटा वाढवण्यात आला. वाढीव कोट्यानुसार २७ गावांना जवळपास ५५ दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवले जाते. तरीही २७ गावांतील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी कोणत्या गावात किती दाबाने व किती पुरविले जाते, याच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. पिसवली येथे वॉल बसवला आहे. मात्र, तेथे दीड किलोच्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात अर्धा किलो दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात पुरेशा दाबाने पाणी मिळते. काही भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही. ही असमान पाणी वाटपाची स्थिती का आली आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला. पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी गतवर्षी महापालिकेने पाच कोटी रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. तसेच पाणी पुरवठ्यासाठी भरावी लागणारी दोन कोटी ४२ लाख रुपये ही अनामत रक्कमही महापालिकेने यंदाच्या वर्षी एमआयडीसीला भरली आहे. याशिवाय दरमहा पाणी पुरवठ्याचे ८० लाख रुपयांचे बिल भरण्याची हमी दिली आहे. पालिकेकडून बिलाचा प्रश्न निकाली निघाला आहे. बिल भरूनही गावांना पाणी मिळत नाही. पाण्याचा कोटाही वाढवला आहे. नेमका कुठे दोष आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शनिवारी २७ गावांतील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व एमआयडीसी पाहणी करून नक्की काय दोष आहे, याचा शोध घेणार आहेत. पाणीपुरवठा कमी दाबाने का होतो, हे तपासले जाणार आहे. टाटा नाका व कोळेगाव येथे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. ही ठिकाणी शनिवारी पाहिली जाणार आहेत. >उद्या पाहणी करून दोष शोधणार२७ गावे आणि एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यातील दोष शनिवारी पाहणी करून शोधला जाणार आहे. नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला घेराव घातला. तेव्हा महापालिकेचे अधिकारी त्याठिकाणी चर्चेसाठी आलेले नसल्याने याविषयी उपमहापौर भोईर यांनी नाराजी व्यक्त केली, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ननावरे यांनी सांगितले.