मुंबई : जहाजावरून शत्रूंच्या विमानांना 70 किलोमीटर्पयत लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र, जहाजावरूनच शत्रूंच्या जहाजांचा वेध घेणारे क्षेपणास्त्र, रॉकेट, तोफा अशा अनेक शस्त्रस्त्रंनी आणि आधुनिकतेने सज्ज असलेली आयएनएस कोलकाता युद्धनौका ऑगस्ट महिन्यात नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. 28 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाला समर्पित केली जाईल, असे नौदलातील वरिष्ठ अधिका:याकडून सांगण्यात आले.
नौदलाच्या ताफ्यात सध्या 203 युद्धनौका आहेत. यामध्ये पारंपरिक युद्धनौका, आण्विक, भूजलचर, विमानवाहू जहाज, युद्धनौकांना पेट्रोल पोहोचवणारी इत्यादींचा समावेश आहे. या युद्धनौका नौदलाकडे असतानाच आता आयएनएस कोलकाता ही युद्धनौका ताफ्यात येणार आहे. यापूर्वीच आयएनएस कोलकाता प्रकारातील एक युद्धनौका ताफ्यात आली आहे. आयएनएस कोलकाता युद्धनौका - 2 हिची बांधणी माझगाव डॉकमध्ये केली आहे. ही युद्धनौका 2010मध्ये नौदलाकडे येणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तिचे काम पूर्ण होण्यास 2014 साल उजाडले. (प्रतिनिधी)
च्बाराक 1 क्षेपणास्त्र- 1 किमी ते 12 किमीर्पयत मा:याची क्षमता.
च्बाराक 8 क्षेपणास्त्र- 0.5 किमी ते 70 किलोमीटर्पयतच्या मा:याची क्षमता.
च्जहाजावरून जमिनीवर आणि जहाजांना मारा करणारे क्षेपणास्त्र-16 ब्राrाोसची क्षमता
च्एक 76 एमएम गन. चार एके 630 सीआयडब्लूएस
च्दोन पाणबुडय़ांना नष्ट करणारी रॉकेट
च्माझगाव डॉकमध्ये आणखी
एक आयएनएस कोलकाता युद्धनौकेचीही बांधणी केली जात असून, ती दोन वर्षात ताफ्यात येईल, असे सांगण्यात आले.