शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आयएनएस गोदावरी निवृत्त

By admin | Updated: December 24, 2015 02:07 IST

नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानली जाणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ बुधवारी निवृत्त झाली.

मुंबई : नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानली जाणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ बुधवारी निवृत्त झाली. तब्बल ३२ वर्षे नौदलात चोख कामगिरी बजावणाऱ्या या युद्धनौकेच्या निवृत्तीने गौरवशाली इतिहासाची सांगता झाली. मुंबईतील नौदलाच्या गोदीत मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने गोदावरीच्या निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ठीक ६ वाजून ७ मिनिटांनी जवानांनी नौकेवरील नौदलाचा पांढरा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून तो गोदावरी युद्धनौकेचे कप्तान विशाल रावत यांच्याकडे सुपुर्द केला. कप्तान रावत यांनी ‘लास्ट पोस्ट’च्या सुरावटीवर पश्चिम मुख्यालयाचे चिफ स्टाफ आॅफीसर व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार यांना कडक सॅल्यूट ठोकत ‘आयएनएस गोदावरी डि-कमिशन्ड सर’ असे रिपोर्ट केले. टपाल खात्याचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ई. व्ही. राव यांच्या हस्ते याप्रसंगी विशेष तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. माझगाव गोदीत ३ नोव्हेंबर १९७८ रोजी या युद्धनौकेच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर १० डिसेंबर १९८३ रोजी सभारंभपूर्वक भारतीय नौदलात तिचा समावेश करण्यात आला. श्रीलंकेत १९८८ मध्ये झालेले नौदलाचे आॅपरेशन ज्युपिटर, सोमालियात भारतीय लष्कराच्या मदतीसाठी १९९४ मध्ये राबवलेले आॅपरेशन शिल्ड आणि आॅपरेशन बोल्स्टर आणि एडनच्या समुद्रात सोमालिया चाच्यांविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमांमध्ये या युद्धनौकेने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.