शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोहटा देवस्थानची चौकशी सुरू

By admin | Updated: January 13, 2017 04:17 IST

राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी देवस्थानची अखेर धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे

सुधीर लंके /अहमदनगरराज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी देवस्थानची अखेर धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. नगरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षकांवर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली असून, अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. देवस्थानच्या इतिहासात प्रथमच अशी चौकशी होत आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने अनेक आक्षेपार्ह निर्णय घेतले आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर भाविकांना धक्का बसला. देवस्थानला भाविकांकडून दान केले जाणारे सोने व चांदी शुद्धीकरणासाठी पाठविताना नियमानुसार कार्यवाही केली जात नाही. २० किलो शुद्ध सोन्याची बँकेत गुंतवणूक करण्याचा ठराव देवस्थानने १ मार्च २०१५ रोजी केला होता. मात्र, या गुंतवणुकीचे प्रमाणपत्र विश्वस्तांना पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे हे सोने नेमके कोठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवस्थानची विश्वस्त भरतीप्रक्रिया मनमानी पद्धतीने केली जाते. निविदा प्रक्रिया न राबविताच कामे केली जातात. सह्यांचे अधिकारही मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखापालच वापरतात, या सर्व बाबींची चौकशी होण्याची शक्यता आहे. सुवर्ण यंत्रांबाबत मौनदेवस्थानने वेगवेगळ्या मूर्तींखाली १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची यंत्रे पुरली आहेत. या वर्षीच्या नवरात्रौत्सवातही ही यंत्रे पुरण्यात आली. या सुवर्ण यंत्रांची मजुरी व पूजाविधीचा खर्चच २४ लाख ८५ हजारांच्या घरात आहे. हा खर्च अधिकृत आहे का, सोने कोणत्या कायद्यानुसार पुरले? याचा खुलासा विश्वस्त मंडळ करत नाही. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर मंडळाची एक बैठक झाली. मात्र त्यानंतरही सुवर्ण यंत्रांबाबत मौन बाळगण्यात आले आहे.