शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोप निश्चित न करताच चौकशी पूर्ण!

By admin | Updated: December 22, 2016 04:07 IST

औषध खरेदीप्रकरणी निलंबित केलेल्या ४ अधिकाऱ्यांपैकी, प्रत्येकाविरुद्ध नेमके कोणते दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत? अशी

अतुल कुलकर्णी / मुंबईऔषध खरेदीप्रकरणी निलंबित केलेल्या ४ अधिकाऱ्यांपैकी, प्रत्येकाविरुद्ध नेमके कोणते दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत? अशी विचारणा करूनही दोषारोप निश्चित करण्याचे काम अजून झालेले नाही, असे मला सांगण्यात आले. ते का झाले नाही, असे विचारले असता, त्याबद्दल आपल्याला काहीही सांगण्यात आले नाही आणि त्याचे कारणही आपल्याला समजले नाही, अशी विदारक स्थिती अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी चौकशी अहवालात नमूद केली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या २९७ कोटी रुपयांच्या औषध खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला होता. त्यानंतर, डॉ. सहाय यांची चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांच्या अहवालात अनेक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.औषध खरेदी ही आरोग्य संचालनालयातील संस्थांसाठी असो किंवा नगर परिषदा, महापालिकांसाठी असो, त्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाचीच आहे, असे ठाम मत नोंदवून, सहाय समिती पुढे म्हणते, ‘ही खरेदी शहरी आरोग्य अभियानाकरिता आहे, त्याचा आमच्याशी संबंध नाही, असे म्हणून कोणीही त्यातून पळ काढू शकत नाही. खरेदी प्रक्रियेची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य संचालनालय आणि संचालनालयाचे औषध खरेदी कक्ष या तिघांचीही आहे.’ सहाय पुढे असेही म्हणतात की, ‘शहरी आरोग्य अभियान कक्षाकडून मागणी प्राप्त झाल्यानंतर, त्याची छाननी कशी करायची, याचे मार्गदर्शन महापालिका व नगरपरिषदांना आरोग्य विभागाने करणे अपेक्षितच आहे. तसे केले नसेल, तर ती आरोग्य विभागाच्या कामातील मोठी चूक आहे.’ ‘कॅल्शियम फॉस्फेट सीरपची बाजारात किंमत ६५ रुपये असताना, तीच बाटली १८ रुपये प्रती दराने खरेदी करण्यात आली, असे आपल्याला सांगण्यात आले, पण ही बाब विश्वासार्ह वाटत नाही. कारण बाजारभाव आणि निविदेतील किमतीत खूप तफावत आहे. एवढे कमी दर निविदेत का आले, याचे कारण समजत नाही. मात्र, या सगळ्याची समितीने अधिक चौकशी केली असता, टेंडर पद्धतीचेच उल्लंघन झाल्याचे समोर आले. एकदा संख्या करार केल्यानंतर पुन्हा परत आॅर्डर देता येत नाही. असे असतानाही आरोग्य संचालनालयाने ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४० कोटींची आॅर्डर देऊन, शासनाच्या टेंडर प्रक्रियेचेच उल्लंघन केले,’ असेही डॉ. सहाय यांनी म्हटले आहे.