श्रीनारायण तिवारी, मुंबईनेव्हीनगरमधील नौदल कमांडरच्या घरात बनावट सौंदर्य प्रसाधनांचा कारखाना सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले होते़ ‘लोकमत’च्या शुक्रवारच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच नौदल अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्य कार्यालय सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नौदल प्रशासनाने या चौकशीची जबाबदारी ‘नोफ्रा’ विभागाकडे सोपविली आहे. नौदलाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण शुक्रवारी लोकमतमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नौदल प्रशासन अडचणीत आले. ही माहिती बाहेर कशी गेली याची चौकशीही केली जात आहे़
नौदलाने स्थापन केली चौकशी समिती!
By admin | Updated: December 27, 2014 04:15 IST