शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी संच विक्रीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 02:16 IST

कोराडी वीज केंद्रातील चार संचांच्या आॅनलाइन लिलावाची चौकशी लोकमतने केली, तेव्हा महाजनकोच्या

सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी वीज केंद्रातील चार संचांच्या आॅनलाइन लिलावाची चौकशी लोकमतने केली, तेव्हा महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; त्यामुळे या घोटाळ्यासाठी नेमके कोण दोषी आहे, ते कळले नाही. या प्रकरणात दोन मुख्य प्रश्न आहेत - कंपन्यांसाठी कडक पात्रता नियम कोणी लावले? आणि ६०.६० कोटी या किमतीची बोली स्वीकारण्याचा निर्णय कोणी घेतला?याबाबत कोराडीचे सध्याचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी हे प्रकरण आधीच्या काळातले असल्याने भाष्य करण्यास असमर्थता व्यक्त केली. तर, कोराडीचे तत्कालीन मुख्य अभियंता उमाकांत निखारे म्हणाले, ‘मी आता नाशिकमध्ये आहे. माझ्याजवळ या प्रकरणांची कागदपत्रे नाहीत, त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही.’ महाजनकोच्या मुख्यालयातील सेंट्रल पर्चेसिंग एजन्सीचे मुख्य अभियंता एस. एम. मारुडकर यांनी सांगितले की, निवेदाप्रक्रियेत भाग घेणाऱ्या कंपन्यांसाठी १०० कोटी मालमत्ता व उलाढालीची अट मिनरल्स अ‍ॅण्ड स्टील ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (एमएसटीसी) सुचवली व ती आम्ही स्वीकारली. परंतु एमएसटीसीने अशी अट इतर कुठल्याही लिलावासाठी ठेवली नाही. मग महाजनकोसाठी वेगळा नियम होता का?, या प्रश्नाचे उत्तर मारुडकर यांनी दिले नाही.याचबरोबर ६०.६० कोटी या किमतीला मान्यता कोणी दिली, या प्रश्नावर मारुडकर यांनी संचालक मंडळाकडे बोट दाखविले. याबाबतीत महाजन्कोचे संचालक (परिचालन) पी. एस. थोटवे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला व ‘महाजन्कोचे अध्यक्ष व प्रबंध संचालक विपीन श्रीमाळी यांच्याशी बोला,’ असे सुचविले. पण प्रयत्न करूनही श्रीमाळी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणात सनविजय रिरोलिंग इंजिनिअरिंग वर्क्सचे अध्यक्ष संजय पी. अग्रवाल यांच्याशीसुद्धा ‘लोकमत’ने संपर्क साधला. ‘आपण सध्या मुंबईत आहोत; त्यामुळे नागपूरला परत आल्यावरच बोलू, असे सांगून फोन बंद केला. कोराडीचे चार जुने संच मातीमोल किमतीत नागपूरच्याच कंपनीला विकले गेले आहेत, हे वास्तव आहे. त्या कंपनीला फायदा पोहचवण्यासाठी महाजनकोने लिलावात भाग घेणाऱ्या कंपन्यांसाठी कडक अटी लादल्या, हेही स्पष्ट आहे. आता महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. महाजनको ही महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे व ती करदात्यांच्या पैशावर उभी झाली आहे. त्यामुळे महाजनकोचे नुकसान हे सार्वजनिक पैशाची हानी आहे. हे लक्षात घेता आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. महाजनकोचा खुलासामहाजनकोच्या अधिकाऱ्यांची बाजू छापत आहोत; मात्र ती न वाचताच महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी महेश आकळे यांनी एक-दोन पानाचा खुलासा ‘लोकमत’कडे रविवारी पाठवला.या खुलाशात कोराडीचे संच ६०.६० कोटीत विकले आहेत, हे मान्य करून महाजन्कोने म्हटले आहे की, या संचाचे पुस्तकीमूल्य २०१२ साली ६०.५५ कोटी होते, त्यामुळे ६०.६० कोटी किंमत योग्य आहे. परंतु लोकमतने दिलेली २५० कोटी किंमत हे बाजारमूल्य आहे. पुस्तकीमूल्य नाही, याकडे महाजनकोने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.१०० कोटी मालमत्ता व वार्षिक उलाढालीची अट एमएसटीसीच्या सूचनेनुसार ठेवली, हेही महाजन्कोने मान्य केले आहे. परंतु एमएसटीसीच्या इतर ऊर्जा संयंत्रासाठी अशी अट ठेवली नव्हती. मग केवळ महाजन्कोसाठीच ही अट का ठेवली? या प्रश्नाचे उत्तर खुलाशात नाही.‘लोकमत’च्या बातमीत लिलाव पूर्ण होताच कोराडीचे अभियंता उमाकांत निखारे यांची नाशिकला बदली का केली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबद्दल महाजन्कोच्या खुलाशात कुठलाही उल्लेख नाही.महाजन्कोच्या खुलाशात इतर अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख आहे. त्याचा संबंधित वृत्ताशी संबंध नाही. कालबाह्य झालेले ऊर्जा संयंत्र विकण्यात गैर काही नाही, पण ती लिलाव प्रक्रिया पारदर्शी असावी एवढीच अपेक्षा आहे.