ऑनलाइन टीम
परळी(बीड), दि. ४ - भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करत परळीकर जनतेने मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना घेराव घातला. शोकाकुल नागरिकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर.पाटील, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील यांच्या गाडीला घेरा घालत त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले यांनीही या मागणीला पाठिंबा दिला.
बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मुंडे अनंतात विलीन झाले. त्यांची कन्या पंकजा यांनी मुंडेच्या पार्थिवाला अग्नी दिला. 'अमर रहे, अमर रहे,' 'मुंडे साहेब परत या' अशा घोषणा देत परळीकरांनी साश्रूनयनांनी मुंडेना अखेरचा निरोप दिला.