शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री खोतकरांच्या तूर खरेदीची चौकशी करा

By admin | Updated: May 24, 2017 03:13 IST

शिवसेनेचे नेते आणि मंत्री वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत कशी खरेदी केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत कशी खरेदी केली, असा सवाल करत या तूर खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.जालना जिल्ह्यात एकूण साडेचार लाख टन तुरीचे उत्पादन झाले असताना एक लाख टनापेक्षा अधिक तूर ही केवळ ८०० लोकांनी विकली आहे. तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केल्यानंतर सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीकडे या ८०० लोकांची यादी दिली असून त्यात खोतकर यांचे नाव आहे. खोतकर कुटुंबीयांनी १४ फेब्रुवारी रोजी १८७ क्विंटल आणि १८ फेब्रुवारी रोजी १९० क्विंटल अशी एकूण ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली. या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पातळीवर सुरू आहे. मात्र एका विद्यमान मंत्र्यांची एवढ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी होईल का, अशी साशंकताही सावंत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मंत्री खोतकर यांनी या आरोपांचा इन्कार केला असून ही सर्व तूर आपल्या शेतातील असल्याचे म्हटले आहे.