शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फर्ग्युसनमधील घटनेची चौकशी करा

By admin | Updated: March 29, 2016 01:35 IST

पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राचार्यांनी का केली, याबाबत चौकशी करून

मुंबई : पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राचार्यांनी का केली, याबाबत चौकशी करून निवेदन सादर करावे, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला दिले.फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून आंबेडकरी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते. हा प्रकार गंभीर असून सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप लोकभारतीचे कपिल पाटील यांनी स्थगन प्रस्तवाच्या माध्यमातून विधान परिषदेत केला. काँग्रेसचे अनंत गाडगीळ, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शरद रणपीसे, भाई जगताप यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, राज्यात सर्वत्र शांतताच आहे. तरीही कुणीही बोलावले नसताना फर्ग्यूसनमध्ये जाऊन उगाचच एखाद्या आमदार जर वातावरण विघडविण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते योग्य नाही. हे करत असताना वंदेमातरम, भारतमाता की जय बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका कुणी घेणार असेल तर सरकार ते कदापी सहन करणार नाही, असेही खडसे म्हणाले. आंदोलन दडपण्याचा होतोय प्रयत्न रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणानंतर देशभरात आंदोलन दडपण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. फर्ग्यूसनमधील प्रकार त्याचाच एक भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजत आंबेडकर यांच्यावर देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप केला जात आहे. देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण? यावरच आता चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली.जय भीमची घोषणा देशद्रोही कशी परवानगी न घेता अभाविपने कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आंबेडकरी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी ‘इस देशमे रहना होगा, जयभीम कहना होगा’, अशी घोषणाबाजी केली. जयभीम बोलणे देशद्रोह आहे का? असे असेल तर मी ही घोषणा देतोे, असे धनंजय मुंडे म्हणाले.