शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळाचा ‘तुकाराम गाथा’ वाचनाचा अभिनव उपक्रम

By admin | Updated: September 6, 2014 00:00 IST

रिसोड तालुक्यात एवती येथे गणेशोत्सवादरम्यात तुकाराम गाथा वाचणाचा उपक्रम.

धनंजय ढेंगडे / रिठदरिसोड तालुक्यांतर्गत येत असलेल्या येवती येथील ग्रामस्थ आठ वर्षापासून एक गाव एक गणपतीबरोबरच गणेशोत्सवादरम्यात तुकाराम गाथा वाचणाचे काम सातत्याने करीत आहेत.येवती येथील ग्रामस्थांनी ८ वर्षापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून एक गाव एक गणपतीची संकल्पना अस्तित्वात आणली. यासाठी गावा तील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य यांच्यासह युवा कार्यकर्त्यांंनी विशेष सहकार्य करण्याचे काम केले. त्यावेळी तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष जाधव होते. गणेशोत्सवासोबतच ग्रामस्थांनी गावात संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्य़ाचा संकल्प केला. तो ते सातत्याने पार पाडत आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सवातही गावत तुकाराम गाथेतील शब्द गावकुसात गुंजत असून त्यामुळे गावात धार्मीक वातावरणाची निर्मीती होण्यास मदत होत आहे. सुरुवातीला केवळ १0 ते १५ लोक यामध्ये सहभागी झाले होते. परंतू आजमीतीला अर्धेअधिक गाव या तुकाराम गाथा पारायणात सहभागी होत आहे. गावातील गणेमंदिराच्या एकूणचे सेवेची जबाबदारी पांडूरंग शिंदे पाहत आहेत. गणेशोत्सवाला अधिक धार्मीक बनविण्यासाठी गावात अखंड हरिनाम सप्ताह व नामसंकिर्तनाचेही आयोजन होत आहे. या उत्सवाकरिता गावातील ज्येष्ठ, युवकांसह महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.** गाव करी ते कुणी ना करी याची प्रचिती येवतीवासियांनी आयोजीत केलेल्या तुकाराम गाथा पारायणातून येत आहे. चार दोन लोकांच्या विचारातून गणेशोत्सवाला अधिकाधिक धार्मीक बनविण्याच्या संकल्पनेतून पुढे आलेली ही संकल्पना आता गावकर्‍यांनी मिळून गावाची संकल्पना बनविली आहे. सारे गावच आजमितीला गणेशभक्तीसह तुकाराम गाथेत तल्लीन झाल्याचे चित्र असून येवतीवासी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दाखवित असलेला एकोपा सर्वांसाठीच प्रेरणादायी असा आहे.