शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पीक कर्जासाठी अभिनव आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 16:51 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, दि. 15 - तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.गेल्या १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ त्यामुळे अरेरावी, मनमानीपणे वागून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व कायदेशीर कारवाई करून त्यांना शासन व्हावे अन्यथा १० दिवसानंतर हतबल व पीडित शेतकरी अर्धनग्न उपोषणास बसतील, असा इशारा येथील तहसिलदारांना यापूर्वी म्हणजे ५ जुलैला देण्यात आला होता़या संदर्भात निवेदन देवून ९ दिवस उलटले तरी शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आजतागायत अरेरावीने व मनमानी कारभार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले नाहीत, तसेच पीडित शेतकऱ्यांच्या निवेदनाची साधी दखल सुध्दा घेतलेली नाही़ गेल्या ३-४ वर्षापासून सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे़ अशाही परिस्थितीत खचून न जाता परिस्थितीशी सामना करीत मागील नुकसान सहन करून पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी पीक पेरणी, बियाणे खरेदी, पाईपलाईन, बोअरवेल, फवारणी, औषधी, खते, वीज पुरवठा, यांत्रिकी व मजुरी याकरीता शेतकऱ्यांना आर्थिक निकड निर्माण झाली आहे़बँकांमध्ये शेतकरी पीक कर्जासाठी जावूनही संबंधित अधिकारी दाद देत नाहीत, अरेरावीने वागतात, आम्ही पीक कर्ज देत नाही, साहेब नाहीत, नंतर या, बँकेचा कोटा पूर्ण झाला, तुमचे क्षेत्र आमच्या बँकेच्या अंतर्गत येत नाही, आदिवासींना पीक कर्ज देता नाही, जुन्या ग्राहकास फक्त कर्ज देतो, तेही सध्या बंद आहे, बँकेचे आॅडिट सुरू आहे, एका महिन्यानंतर या अशी एक ना हजार कारणे सांगून पीक कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची बॅँक अधिकाऱ्यांकडून बोळवण केली जात आहे़ त्यामुळे शेतकरी हतबल ठरले आहेत.शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना जाहीर कराव्या, मात्र ज्यांच्या मार्फत त्या राबविल्या जातात त्या बँकांच्या उदासिनतेचा परिणाम म्हणून शेतकरी त्या पासून आजही वंचित राहिलेला आहे़ अखेर हतबल शेतकऱ्यास सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे़ परिणामी सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशीवेळ शेतकऱ्यांवर येवू नये म्हणून झोपेचे सोंग घेणाऱ्या संवेदनाहीन बॅँक अधिकारी व शासनास जागे करण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.गेल्या नऊ दिवसांत काही हालचाल न झाल्याने येथील तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले़ या आंदोलनाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरतसिंग राजपूत, शहरप्रमुख कन्हैय्या राजपूत, शिरपूर विकास आघाडीचे चंदनसिंग राजपूत, निलेश गरूड, मनसेचे मयूर राजपूत, स्वप्नील जाधव यांच्यासह बहुतांश कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.