शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: July 15, 2017 01:46 IST

तरुण व पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सक्रिय सहभागी व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : तरुण व पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांचे नाव मतदारयादीमध्ये नोंदविण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत १८ ते २१ वर्षांच्या तरुण व पात्र प्रथम मतदारांचा समावेश मतदारयादीमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आणि नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात, मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम प्राधान्याने राबवावी, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केली. बैठकीला जिल्ह्यातील मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.मतदार नोंदणीसाठी प्रशासनाकडून विविध स्तरात जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक नागरिकांनी नवमतदार नोंदणी करावी, यासाठी महाविद्यालयातही मोहीम हाती घेण्यात आली आहे. >नाव नोंदणी : ३१ जुलैपर्यंत विशेष मोहीम तरुण व पात्र प्रथम मतदारांच्या मतदारयादीमध्ये नावनोंदणीसाठी ३१ जुलै पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या १८ ते २१ वयोगटातील सर्व पात्र व तरुण मतदारांचे अर्ज भरून घेण्यात यावे, महाविद्यालयांना फॉर्म क्रमांक ६ चे वाटप करावे, मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश दिला. तसेच मतदारयादीत नाव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावनोंदणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.