शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार हवा

By admin | Updated: April 29, 2016 01:48 IST

एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

देऊळगावराजे : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दुष्काळाचा सामना करणे काळाची गरज असून, एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.दौंड शुगर व एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव (ता. दौंड) येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. एन्हॉर्यमेंटल फोरमची स्थापना गेली सहा वर्षांपूर्वी झाली. ओढे रुंदीकरणाचे काम करताना ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे या पुढील काळात पाणीबचतीचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.या वेळी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, दौंड शुगर व एन्हॉर्यमेंटल फोरमच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव या गावांचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम करण्यात आले. दौंड शुगरच्या माध्यमातून ड्रीपसारख्या योजना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या वेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियोजन केले पाहिजे. भाजपाचे नेते वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे या मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्या मनीषा लव्हे, बोरीबेलच्या सरपंच हिराबाई आटोळे, उपसंरपच दत्ता पाचपुते, दत्ता खळदकर, रमेश पाचपुते, माऊली चव्हाण, हनुमंत पाचपुते, उत्तम आटोळे, शरद सूर्यवंशी, पिंटू पाचपुते, माऊली कापसे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.>बोरीबेल व आलेगाव येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामांचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष महत्त्वाचावासुदेव काळे म्हणाले की, कालचा दौंड तालुका बागायती होता. आता त्याची वाटचाल जिरायती भागाकडे सुरू झाली आहे. तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी आणि दुष्काळ निवारण्यासाठी सर्र्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. कार्यक्रम वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. मात्र कार्यक्रम कोणाचा आहे, याचा विचार न करता हिताचा हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून उपस्थितीत राहिलो आहे, अशीच भावना सर्व राजकीय पक्षांनी दुष्काळ निवारणासाठी केली पाहिजे.