शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना जागृतीसाठी ‘पूर्णवाद’चा पुढाकार

By admin | Updated: November 26, 2014 01:56 IST

ज्या मौलिक तत्त्वांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, ती राज्यघटना विद्यार्थी, सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘पूर्णवाद’ परिवाराने पुढाकार घेतला आहे.

आज संविधान दिन : राज्यभरातील युवकांचा सहभाग
सुदाम देशमुख - अहमदनगर
ज्या मौलिक तत्त्वांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, ती राज्यघटना विद्यार्थी, सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘पूर्णवाद’ परिवाराने पुढाकार घेतला आहे. संविधान दिनानिमित्त बुधवारी शहादा (जि. नंदूरबार) येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकेडमी ही संस्था स्थापन करून त्याद्वारे संविधान जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. पूर्णवाद युवा फोरमचे संस्थापक लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्याकडे संविधान जागृतीची धुरा सोपविली. त्यांनी पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकेडमी संस्थेच्या राज्यात 37 ठिकाणी शाखा स्थापन करून त्याद्वारे 1 हजार युवक जोडले आहेत. शाळा, महाविद्यालयात जाऊन व सर्वसामान्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात चर्चासत्र, व्याख्याने, रॅली काढण्यात आल्या. संविधान जनजागरण अभियानांतर्गत शासनाने प्रकाशित केलेले ‘संविधान ग्रंथ’ भेट दिले जात आहेत, असे अॅकेडमीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल संत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  पूर्णवाद युवा फोरमच्या शाखांद्वारे गेल्या 2क् वर्षापासून सामाजिक, वैज्ञानिक, बौद्धिक उपक्रम घेतले जातात. राजकारणात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी ही संस्था युवकांना प्रेरणा देण्याचे काम करते.
 
काय आहे संविधान दिन?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही राष्ट्राला स्वतंत्र राज्यघटना असावी, यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांत घटनेचा मसुदा तयार केला. हा मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानिक सभेत अंगीकृत व अधिनियमित करून देशाने स्वत:प्रति अर्पित केला, म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.