शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचत करण्यासाठी सोसायट्यांचा पुढाकार

By admin | Updated: May 20, 2016 02:44 IST

सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे.

अपर्णा जगताप,

मुंबई- राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील हायवे दर्शन सोसायटीने अनोखी उपाययोजना केली. या सोसायटीचे सचिव प्रशांत वाढीवकर यांनी दोन्ही इमारतींतील सगळ्या घरांमधील गळतीची तपासणी करून ते दुरुस्त करून घेतले. दिवसभर पाणी वापरण्याऐवजी दुपारी २.३० ते सायं. ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे महानगरपालिकेकडून पाणी कमी आल्यास या साठ्याचा उपयोग सोसायटीला होऊ लागला आहे. आठवड्यातून एकदाच गाड्या धुण्याचे आवाहन सभासदांना करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीबचत होत आहे. बोअरिंगचे पाणी झाडांसाठी वापरण्यात येते. सोसायटीच्या आवारात वापरासाठी बसवण्यात आलेल्या ३ नळांपैकी २ नळांचे कनेक्शन गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही अतिरिक्त पाणी वापर कमी झाल्याचे वाढीवकर यांनी सांगितले. ‘गरजेपुरता पाण्याचा वापर’ असा संदेश या सोसायटीकडून दिला जात आहे. चुनाभट्टीतील गिरीश अपार्टमेंट आणि ठाण्यातील साकेत अपार्टमेंट यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या दिवसभर पाणी सोडण्याऐवजी फक्त अर्धा तासच पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे सर्व सभासद या उपक्रमाला साथ देत आहेत. कमी पाण्यात अधिकाधिक दैनंदिन कामे करण्याकडे या दोन्ही सोसायट्यांचा कल आहे.