शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयच्या परीक्षेला मुहूर्त

By admin | Updated: June 15, 2017 01:20 IST

आपल्या खाकी वर्दीवर दोन ‘स्टार’ लावण्याची इच्छा असलेल्या राज्य पोलीस दलातील सव्वा लाखांवर अंमलदारांना आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या खाकी वर्दीवर दोन ‘स्टार’ लावण्याची इच्छा असलेल्या राज्य पोलीस दलातील सव्वा लाखांवर अंमलदारांना आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठीच्या मर्यादित परीक्षेला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. येत्या १० सप्टेंबरला राज्य लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा होणार असून, त्यासाठी ४ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. एकूण ३२२ पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १५८ जागा आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील विविध ७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. त्यात पात्र ठरणाऱ्यांची मुख्य परीक्षा २४ डिसेंबरला घेतली जाणार आहे. यापूर्वी विभागीय परीक्षा गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. या वर्षी अद्याप तारीख जाहीर झाली नव्हती. मात्र आता परीक्षेचा मुहूर्त निघाला असून, १० सप्टेंबरला होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक अंमलदारांनी https ://mahampsc.mahaonline.gov.in  या वेबसाईटवरून अर्ज भरायचे आहेत. खुल्या गटातील उमेदवारासाठी १ जानेवारीला ३५ वर्षांहून अधिक वय नसावे, तसेच मागासवर्गीय गटासाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. या परीक्षेसाठी उमेदवार सलग तीनवेळा बसू शकतो. त्यानंतर परीक्षेला बसण्याची संधी त्याला मिळत नाही. परीक्षेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अमरावती व नाशिक ही केंद्रे असून, परीक्षार्थींना त्यांचा सांकेतांक आॅनलाइन अर्जात नमूद करावयाचा आहे. पूर्व परीक्षा १०० तर मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी अनुक्रमे ३०० व १०० गुण असणार आहेत. पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्याला मुख्य व शारीरिक परीक्षा देता येणार आहे. पीएसआयची पदे भरण्यासाठी रोटेशनप्रमाणे उपलब्ध जागांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला होता. इच्छुक परीक्षार्थींना परीक्षेच्या अभ्यासासाठी जास्तीतजास्त सवलत मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना सर्व घटकप्रमुखांना देण्यात येतील. - सतीश माथूर ( पोलीस महासंचालक)