शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

गर्भलिंग तपासणीसाठी अमानुष छळ

By admin | Updated: September 1, 2014 23:23 IST

पहिल्या दोन मुलीच झाल्या. तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंगचिकित्सा करण्याच्या पतीच्या मागणीस नकार दिल्याने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीचा अमानुष जाच केला.

इंदापूर : पहिल्या दोन मुलीच झाल्या. तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंगचिकित्सा करण्याच्या पतीच्या मागणीस नकार दिल्याने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीचा अमानुष जाच केला. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणा:या पतीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात आज (दि. 1 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी प्रकारात जन्माला येण्यापूर्वीच अपत्य तिच्या पोटातच दगावले. 
या प्रकरणी विलास लक्ष्मण ठवरे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अश्विनी विलास ठवरे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी तिचे वडील धनाजी सिताराम मारकड (रा. कौठळी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. मुलीसह तिच्या पोटातील गर्भ देखील दगावला असल्याने या प्रकरणी कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 
चार वर्षापूर्वी अश्विनी यांचा विवाह विलास ठवरे याच्याबरोबर झाला. विवाहानंतर दोन मुली झाल्या. तिस:यांदा मुलगी नको म्हणून त्याने सतत गर्भलिंग चिकित्सा करण्याचा आग्रह धरला. दीड महिन्यापूर्वी विलास याने तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. तिथे गर्भलिंग तपासणी करायची आहे. मुलीचा गर्भ असेल तर तो खाली करायचा आहे. तसेच, विहिरीसाठी 1 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती. 1 लाख रुपये देण्यास व गर्भलिंग तपासणी करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे पत्नी अश्विनी हिला माहेरी सोडून निघून गेला. 
तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंग तपासणी करावी, असा आग्रह आहे. मुलीचा गर्भ असल्यास पती छळ करतो. त्याच्याकडून होणारा त्रस असह्य आहे. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा पाठवू नका. ते जिवंत सोडणार नाही, असे अश्विनी हिने वडील धनाजी मारकड यांना सांगितले. मात्र, तिची समजूत घालून नांदण्यास पाठविले. त्या नंतर 31 ऑगस्ट रोजी पुतण्या दयानंद मारकड याने अश्विनी आजारी आहे. तिला दवाखान्यात दाखल केले आहे, असे सांगितले. त्यानंतर वडील व अन्य कुटुंब इंदापूरला गेले. दवाखान्यात विलास ठवरे याने भांडण करून त्रस दिल्याने विषारी औषध घेतल्याचे तिने सांगितले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.  अश्विनीच्या पहिल्या दोन मुलींचे वय अनुक्रमे 2, 1 वर्ष आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस कर्मचारी दीपक पालके, अमित यादव तपास करीत आहेत. (वार्ताहर)
 
अश्विनीचे वडील धनाजी मारकड यांना 6 मुली आहेत. त्यांतील थोरल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अश्विनीचा पतीच्या छळामुळे मृत्यू झाल्याने त्यांना धक्का बसला.