शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या डिकीमध्ये कोंबून गुरांची अमानुष तस्करी

By admin | Updated: October 20, 2016 03:32 IST

महाराष्ट्रात गोवंश हत्येला कायद्याने बंदी असूनही अनेक मार्गांनी गोवंश कत्तलीसाठी नेण्याचे प्रकार घडत आहेत.

वसई/पारोळ : महाराष्ट्रात गोवंश हत्येला कायद्याने बंदी असूनही अनेक मार्गांनी गोवंश कत्तलीसाठी नेण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला लागून असलेल्या गुजरात सीमावर्ती भागातून म्हणजेच मुंबई अहमदाबाद या महामार्गावरून अशा प्रकारची वाहतूक सुरूच असल्याचे पुन्हा एकदा मंगळवारी (१८ आॅक्टोबर) पहाटे घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर पालघर पोलीस मुख्यालयातून गस्त ड्युटीवर तैनात असलेले सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सूर्यवंशी हे गुजरात दिशेकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी १८ आॅक्टोबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास उभे होते. त्यावेळी त्यांना पाहून मुंबई दिशेने जाणाऱ्या एम एच ०१ व्ही ९१५२ या लाल रंगाच्या वेगनार गाडीच्या चालकाने गाडी रोडच्या साईडला उभी करून पाचारुखे गावाच्या बाजूने असलेल्या जंगलात गाडीतील तिघांनी पळ काढला. सूर्यवंशी यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते पळून गेले. यावेळी कारच्या पाठीमागील भाग हा अत्यंत दबलेला दिसला. तसेच प्रवासी गाडीत प्रवासी नसून काहीतरी वजनदार माल भरल्याचा सूर्यवंशी यांना संशय आला. अगदी जवळून पाहिले असता त्यांना. गाडीच्या मागच्या सीट काढून त्यामध्ये एक तांबड्या रंगाची गाय व एक सफेद रंगाच्या बैलाला अतिशय अमानुषपणे अरुंद जागेत हातपाय बांधून दुमडून कोंबले होते. त्यामुळे त्यांनी टोलनाक्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना जनावरे चोर पळत असल्याचे ओरडून सांगितले. याचवेळी पोलीस कर्मचारी नरसाळे व घेरे यांना कळविले. दरम्यान, सूर्यवंशी यांनी दिलेल्या आवाजामुळे शेजारील पाड्यात राहणारे रवींद्र केशव ठाकरे, बाबल्या मधुकर ठाकरे व प्रकाश मन्या तुंबडा यांनी दोन इसमांना झाडीतून पकडून आणले. (वार्ताहर)>दोघा तस्करांना पकडले; मुख्य आरोपी पळाला पळून जाताना पकडून आणलेले इरफान सलीम सय्यद (३३) राहणार रेती बंदर कल्याण व व मुर्तुजा ऊर्फ अल्ताफ मुस्तफा शहा (२०) राहणार भिवंडी यांना सूर्यवंशी यांनी आलेल्या मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, अन्सार नावाचा मुख्य आरोपी फरार झाला. मांडवी पोलीस, सूर्यवंशी व या भागातील समाज सेवक बंडू गावंड यांनी सदर गायीला व बैलाला जवळच असलेल्या जिवद्या मंडळ मुंबई यांच्या गोशाळेत नेवून तेथील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. गाडीतील हे गोवंश घुसमटून उलटे करून बांधलेले व बेशुद्ध अवस्थेत होते. दोन इंजेक्शन व लाल रंगाची बाटली तसेच गाडीच्या डेस्क बोर्डमध्ये दोन इंजेक्शन व लाल रंगाची बाटली सापडून आली असून याद्वारे गोवंशाला बेहोश केल्याचे समजले. तसेच हे गोवंश फरार आरोपी अन्सार यांच्या सांगण्यावरून चारोटी जवळील भागातून आल्याचेही पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले. मांडवी पोलिसांनी आरोपी व गाडी त्यांच्या ताब्यात घेऊन या गुन्ह्याची नोंद केली असून फरार आरोपीचा तपास सुरु केला आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांना भूल देणारे इंजेक्शन देऊन प्रथम बेशुद्ध केले जाते. त्यानंतर त्यांना वरील प्रमाणाच्या प्रवाशी वाहनात क्रूरतेने कोंबून वाहतूक केली जाते. मोकाट जनावरे पहाटेच्यावेळी विश्रांती करत नाक्यावर किंवा मोकळ्या जागेत बसलेले असतात याचा फायदा गो तस्कर घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.