शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेव्हण्याने केली जावयाची अमानुष हत्या

By admin | Updated: August 8, 2016 14:39 IST

बहिणीला होणारा त्रास अन् आर्थिक व्यवहारातून वैमनस्य आल्यामुळे मेव्हण्याने त्याच्या जावयाची अमानुष हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ -  बहिणीला होणारा त्रास अन् आर्थिक व्यवहारातून वैमनस्य आल्यामुळे मेव्हण्याने त्याच्या जावयाची अमानुष हत्या केली. रविवारी सकाळी नंदनवनमध्ये ही थरारक घटना घडली. अरविंद रुपचंद पराते असे मृताचे नाव आहे.
गुन्हेगारी वृत्तीचा अरविंद वादग्रस्त प्रॉपर्टी डिलींगचे काम करायचा. पपत्नी अलकाचा तो शारिरिक आणि मानसिक छळ करीत होता. अलकाचा भाऊ आरोपी राजू महादेव वंजारी  आणि त्याचा भाऊ गज्जू हा एका गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलकाचा छळ होत असल्यामुळे राजू आणि गज्जूचे जावई अरविंदसोबत अजिबात पटत नव्हते. एका वादग्रस्त मालमत्तेच्या आर्थिक व्यवहारातूनही त्यांच्यात वैमनस्य आले होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. दोन-तीन दिवसांपासून अलका हिला मारहाण करणे, शिवीगाळ करणे वाढल्याने अलकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घरगुती वाद म्हणून पोलिसांनी  दोघांनाही समज दिली. त्यानंतर अलका माहेरी निघून गेली.  
रविवारी नागपंचमीचा सण असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ८.३० च्या सुमारास अरविंद सास-याच्या घरी आला आणि पत्नी अलकाला घरी नेण्यासाठी जबरदस्ती करू लागला. अलकाची त्याच्यासोबत जाण्याची ईच्छा नसल्याने तिचा भाऊ आरोपी राजू याने अरविंदला तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. परिणामी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.  रागाच्या भरात राजूने बाजूची काठी उचलून अरविंदला बदडणे सुरू केले. नंतर दगड, विटा, वरवंटा, फरशीचा तुकडा, धारदार शस्त्र असे हातात येईल ते उचलून आरोपी राजूने अरविंदला अक्षरश: ठेचून काढले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेला.  या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा पोहचला. त्यांनी अरविंदचे वडील रुपचंद महादेव पराते यांच्या तक्रारीवरून आरोपी राजूविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
 
सासरच्यांनीच केले अंत्यसंस्कार 
अरविंदचे परिसरात फारसे कुणाशी पटत नव्हते. नातेवाईकही त्याच्यासोबत फटकून वागत होते. त्याची हत्या झाल्यानंतर सासरच्यांनीच मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या हत्या प्रकरणात आरोपी राजूचा भाऊ गज्जू याची काय भूमिका आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, अटक केल्यानंतर आरोपी राजूचा रक्तदाब आणि शूगर अचानक वाढली. त्याची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले.