शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाचे अपहरण करून अमानुष मारहाण

By admin | Updated: December 30, 2016 17:47 IST

एका दहावीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलाचे शुक्रवारी सकाळी अपहरण करून त्यास जबर मारहाण करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतलातूर (चापोली), दि. 30 - नेहमीप्रमाणे शाळेस जाणाऱ्या चापोली (ता. चाकूर) येथील एका दहावीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलाचे शुक्रवारी सकाळी अपहरण करून त्यास जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान, तो बेशुद्ध पडल्याचे पाहून अपहरणकर्त्यांनी घरणीजवळील पुलानजीक फेकून दिले. सुदैवाने तिथून जाणाऱ्या शेतकऱ्यास मुलगा जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिल्याने त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अजय सुरेश मल्लिशे (१६, रा. चापोली, ता. चाकूर) असे या मुलाचे नाव आहे. चापोली येथील अजय मल्लिशे हा गावातीलच संजीवनी विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी सकाळी शाळेला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडला. दरम्यान, तो शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला असता अज्ञात व्यक्तींची त्याचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. वाहनात त्याच्या डोक्यास, पोटाला आणि पायाला जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यास घरणीनजीकच्या पुलाजवळ फेकून दिले आणि अपहरणकर्ते पसार झाले. या रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका शेतकऱ्यास मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती नागरिकांना दिली़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. पुंडलिक चाटे, पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार, युवासेना जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण पेटकर, शिवसेना तालुका प्रमुख अंगद पवार, चाँद मोमीन, शेखर पाटील, सुरेश भालेराव यांनी घरणीकडे धाव घेऊन त्याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.