शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेपरलेससाठी माहिती तंत्रज्ञान कक्ष

By admin | Updated: July 28, 2015 02:21 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कागदांचा कमीतकमी वापर करून बहुतांश कामे आॅनलाइन पद्धतीने व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच दृष्टीने शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद

पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कागदांचा कमीतकमी वापर करून बहुतांश कामे आॅनलाइन पद्धतीने व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच दृष्टीने शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महापालिका आदींमध्ये पेपरलेस कामांसाठी स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.सरकारी कारभार आॅनलाइन करण्यासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यानंतर ई-गव्हर्नन्स प्रकल्पाची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण असण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. संबंधित कक्षाचे प्रमुख हे सचिव, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी असणार आहेत. या कक्षातर्फे करण्यात येणारी कामे-संबंधित सरकारी कार्यालये आॅनलाइन जोडणार-नागरी सुविधा आॅनलाइन देणार-राज्य माहिती केंद्राशी समन्वय-ई-आॅफिस प्रणालीची अंमलबजावणी करणार-ई-निविदा, ई-लिलाव राबविणार-जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन व स्कॅनिंग -ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पाशी निगडित सेवा राबविणार-कार्यालयाच्या संकेतस्थळाचे व्यवस्थापन-मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू करणे-बायोमॅट्रिक उपस्थितीची जोडणी व नोंद-शासकीय ई-मेल प्रणाली राबविणे