शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीला कायदेशीर आधार नाही

By admin | Updated: February 12, 2016 01:55 IST

मुंबई हल्ल्याच्या (२६/११) आधी मुंबईवर हल्ल्याचे दोन फसलेले प्रयत्न आणि लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आत्मघाती हल्लेखोर इशरत जहाँबाबत डेव्हिड हेडली याने जी माहिती दिली तिला कायदेशीर

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमुंबई हल्ल्याच्या (२६/११) आधी मुंबईवर हल्ल्याचे दोन फसलेले प्रयत्न आणि लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आत्मघाती हल्लेखोर इशरत जहाँबाबत डेव्हिड हेडली याने जी माहिती दिली तिला कायदेशीर आधार नाही, असे मुंबई पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हेडलीने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही मोल नाही; व त्याने जे काही दावे केले आहेत त्याला दुजोरा देणारे काहीही नाही, असे हे अधिकारी म्हणाले.अधिकारी म्हणाले की, मुंबईवर २००८मध्ये दहशतवादी हल्ला होईल असा अगदी क्षीण म्हणता येईल असा अंदाज गुप्तचर विभागाने (आयबी) व्यक्त केला होता. परंतु वस्तुस्थिती अशी होती की इशरत जहाँ ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती ही बाब चांगली माहीत होती. पण वादाचा मुद्दा ठरला तो तिला अतिशय थंड डोक्याने चकमकीत मारण्यात आल्याचा. इशरत जहाँचे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे हेडलीने जे काही सांगितले त्याचा आमच्या प्रकरणावर काय परिणाम होईल याबद्दल केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) काहीही भाष्य करण्यास तयार नाही.डेव्हिड कोलमन हेडलीने गुरुवारी दिलेल्या साक्षीमध्ये इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती आणि भारतात जी कारवाई फसली तिच्याशी तिचा संबंध होता, असे मी ऐकले आहे, असे सांगितले होते. हे विधान ऐकीव वा अफवेच्या स्वरूपातील असून, न्यायालय त्यावर विश्वास ठेवत नाही. हेडली हा इशरत जहाँ प्रकरणात साक्षीदार आहे का? तो कथानक सांगत असून, चकमकीच्या प्रकरणावर त्याच्या विधानाचा काहीही परिणाम होणार नाही. तो प्रकरणाला खळबळजनक बनवू पाहत आहे. उद्या हेडली म्हणेल, १९९३चा स्फोट दाऊद इब्राहिमनने घडवून आणला होता. या साक्षीमुळे नेमका काय परिणाम होणार आहे, असे माजी आयपीएस अधिकारी आणि आता वकील बनलेले वाय. पी. सिंह यांनी म्हटले.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंह म्हणाले की, इशरत जहाँ ही दहशतवादी गटाचा भाग होती याबद्दल पोलीस वर्तुळाला कधीही शंका नव्हती. तिचे मत प्रचंड प्रयत्नांनंतर बदलण्यात आले होते (ब्रेनवॉशड्) व तिचे पालक किंवा तिचे नातेवाईक यांचे काहीही मत असले तरी ती लष्कर-ए-तोयबासाठी काम करीत होती. चकमक ज्या पद्धतीने (थंड डोक्याने विचार करून) घडली त्या पद्धतीबद्दल वाद होता. इशरत स्त्री असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना फार मोठी सहानुभूती मिळाली; परंतु पोलीस अधिकाऱ्यांना तिचा दहशतवादी इतिहास पुरेसा ठावुक होता, असे एम. एन. सिंह म्हणाले. २६/११च्या हल्ल्यापूर्वी मुंबईवर दोन वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न फसला, असे हेडलीने साक्षीत सांगितले. त्याची गुप्तचरांना माहिती मिळविण्यात अपयश आले का, असे विचारले असता सिंह म्हणाले की, ‘‘गुप्तचरांना तसे काही अपयश आलेले नव्हते कारण ताज आणि ओबेरॉय हॉटेल, सिद्धिविनायक मंदिराला दहशतवादी लक्ष्य करू शकतात अशी निश्चित माहिती होती म्हणून तेथे सुरक्षा वाढविण्यात आली. त्यामुळे गुप्तचरांना अपयश आले, असे म्हणता येणार नाही. परंतु दोन महिने हल्ले न झाल्यामुळे हॉटेलचे व्यवस्थापन आणि अधिकारी शिथिल झाले. सुरक्षा व्यवस्थेमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापनाने म्हटले होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली, असे म्हणण्याऐवजी मी अचूक गुप्त माहिती काढता आली नाही, असे म्हणेन.’’इशरत जहाँ चकमक प्रकरणावर हेडलीने सांगितलेल्या गोष्टींचा काय परिणाम होईल, असे विचारले असता सीबीआयचा प्रवक्ता म्हणाला की, ‘चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. इशरत जहाँ प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे हेडलीने केलेल्या दाव्यांबद्दल आम्ही काहीही मत व्यक्त करणार नाही.’’एम. एन. सिंह म्हणाले... मुंबईवरील हल्ल्याचे दोन प्रयत्न फसले या हेडलीच्या दाव्याची खातरजमा करता येऊ शकत नाही. हे अपयश कुठे घडले हे कोणाला माहिती आहे व ही माहिती २६/११च्या हल्ल्यानंतर सात वर्षांनी समोर येत आहे, असे सिंह यांनी सांगितले. वाय. पी. सिंह यांनी हेडलीची साक्ष चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. वाय. पी. सिंह म्हणाले... की भारतात त्याचा कोणाशी संपर्क होता हे का विचारले जात नाही. आम्ही त्याला पाकबद्दलच विचारत आहोत व त्या माहितीला आम्ही काहीही आधार देऊ शकत नाही. ताडदेव येथे दुकान सुरू करायला तुला कोणी मदत केली हे त्याला आम्ही विचारले पाहिजे. एक अमेरिकन नागरिक अनेक लोकांना भेटतो ते का? असा संशय यंत्रणांना का आला नाही. त्याने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही किंमत नाही, असेही वाय. पी. सिंह म्हणाले.