शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती लपविली म्हणून नेमणूक रद्द करता येणार नाही

By admin | Updated: February 9, 2017 05:24 IST

नोकरी मागताना स्वत:वर दाखल गंभीर गुन्ह्यांची माहिती लपविली, या कारणावरून कुणाचीही नेमणूक रद्द करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे

राजेश निस्ताने, यवतमाळनोकरी मागताना स्वत:वर दाखल गंभीर गुन्ह्यांची माहिती लपविली, या कारणावरून कुणाचीही नेमणूक रद्द करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांनी दिला आहे. हा निर्णय देताना ‘मॅट’ने पोलीस शिपाई संजय लोटन रायसिंग यांची नियुक्ती रद्द करण्याचा, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा आदेश रद्दबातल ठरविला. सोबतच रायसिंग यांची चार महिन्यांत खातेनिहाय चौकशी पूर्ण करा, ती न केल्यास त्यांच्या सेवामुक्तीचा आदेश आपसूकच रद्द होईल व त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी पोलीस मॅन्युअलच्या आधारे रायसिंग यांच्या सेवामुक्तीची कार्यवाही केली. तथापि, मुंबई पोलीस कायदा १९५१, सेवा, नियम, शिस्त व अपील अस्तित्वात आहे. मॅन्युअलपेक्षा कायदाच श्रेष्ठ असल्याचे शिक्कामोर्तबही ‘मॅट’ने ३० जानेवारी रोजी निर्णय देताना केले आहे.न्यायालयासमोर सेवामुक्तीरायसिंग यांना सेवामुक्तीबाबत कळविल्याचे शासनाच्या वतीने ‘मॅट’मध्ये सांगण्यात आले. मात्र, त्याचा पुरावा शासन देऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयासमक्ष या सेवामुक्तीचा आदेश रायसिंग यांना बजावला गेला. त्यानंतर, या आदेशाला त्यांनी ‘मॅट’मध्येच आव्हान दिले गेले. रायसिंग यांच्या सेवामुक्तीमागे ‘त्यांच्या सेवेची आवश्यकता नाही’ एवढेच कारण नमूद केले गेले. त्यावर नियुक्तीच्या यादीमध्ये रायसिंग यांच्यापुढे असलेल्या दहा ते पंधरा पोलीस शिपायांची मग आवश्यकता कशासाठी, असा प्रश्न रायसिंग यांचे वकील अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी शासनाला विचारला. नियमानुसार एक महिन्याची नोटीस किंवा वेतन न देता, रायसिंग यांना नोकरीवरून हटविले गेले. ही बाब नैसर्गिक न्याय तत्त्वाला धरून नाही. हा आदेश नियमबाह्य असल्याचे मान्य करीत, ‘मॅट’ने रायसिंग यांच्या सेवा समाप्तीचा आदेश रद्दबातल ठरविला.मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले संजय रायसिंग हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शिपाई म्हणून भरती झाले. या नियुक्तीच्या वेळी साक्षांकित नमुन्यामध्ये रायसिंग यांनी आपल्यावर दाखल फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविली. वास्तविक, गावातील कौटुंबिक कलहातून दाखल झालेल्या मारहाणीच्या या गुन्ह्यात त्यांची मेरीटवर निर्दोष मुक्तता झाली होती. २००८मध्ये त्यांना याच कारणावरून पोलीस शिपाईपदावरून काढून टाकण्यात आले.