शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नवोपक्रमशील शाळांची माहिती आता गुगल फॉर्मवर

By admin | Updated: October 20, 2015 02:47 IST

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्यात अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळांचे लक्ष्य परीक्षा परिषदेने समोर ठेवले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून २०० नवोपक्रमशील शाळांची

- प्रवीण खेते,  अकोला‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्यात अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळांचे लक्ष्य परीक्षा परिषदेने समोर ठेवले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून २०० नवोपक्रमशील शाळांची निवड करण्यात आली असून त्यांची माहिती गुगल फॉर्मवर टाकण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विद्या परिषदेमार्फत नवोपक्रमशील शाळांची माहिती गोळा करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये प्रत्येक केंद्रातून २ नवोपक्रमशील शाळांचा समावेश असणार आहे. या शाळांमधील भाषा व गणित या विषयाच्या प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करून त्यांना विद्या परिषदेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित शिक्षकांमार्फत या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, जेणेकरून राज्यातील शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त होण्यास मदत होईल. गुगल फॉर्मवर आलेल्या नवोपक्रमशील शाळा या केंद्रातील इतर शाळांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याने केंद्र शासनाने यासाठी विशेष तरतूद केली आहे.माहिती सादर करण्यात जिल्ह्याची पीछेहाटराज्यातील नवोपक्रमशील शाळांची माहिती गुगल फॉर्ममध्ये नोंदवण्यासाठी नांदेड, रत्नागिरी, यवतमाळ हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्हा परिषद व महानगरपालिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत नवोपक्रमशील शाळांची निवड करण्यात येत आहे. राज्यातील शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अकोलाविभागनिहाय नवोपक्रमशील शाळांची संख्या : पुणे : २०४, नागपूर : ४६१, औरंगाबाद : ४८२, मुंबई : २२९, कोल्हापूर : ४००, अमरावती : ४११, नाशिक : २८५, लातूर : ३९०