शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘इफेड्रीन’प्रकरणी होणार सखोल चौकशी

By admin | Updated: February 3, 2017 02:10 IST

करोडो रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी चौकशीसाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके गुजरात आणि सोलापूरला रवाना झाली आहेत. अमेरिकन पोलिसांनी अटक केलेला

- जितेंद्र कालेकर,  ठाणेकरोडो रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी चौकशीसाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके गुजरात आणि सोलापूरला रवाना झाली आहेत. अमेरिकन पोलिसांनी अटक केलेला मुख्य सूत्रधार विकी गोस्वामीसह सर्वच आरोपींविरुद्धचे भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी बुधवारी अटक केलेल्या किशोर राठोड आणि भरत काठिया यांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोलापुरातून देशविदेशांत इफेड्रीनची तस्करी करणाऱ्या सूत्रधारांपैकी एक जयमुखीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीच इफेड्रीन प्रकरणातील तिसरे ३४० पानांचे आरोपपत्र ठाणे विशेष जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे न्यायालयात किशोर राठोड आणि भारत काठिया यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यांच्याकडील चौकशीमध्ये किशोरने अनेक बाबींची कबुलीच पोलिसांना दिली. जयमुखीने नोंदवलेल्या जबानीतील अनेक बाबींमध्ये तथ्यता आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.इफे ड्रीनच्या तस्करीसाठी एव्हॉनचा तत्कालीन संचालक मनोज जैन, पुनीत श्रींगी आदींबरोबर केनिया, दुबई आणि मुंबईतील बैठकांना जयमुखी हजर होता. शेअरखरेदीचे ज्ञान अवगत असल्यामुळे एव्हॉनचे शेअर्स ममताच्या नावावर करण्याची प्रक्रियाही त्याने सुरू केली होती. किशोर आणि मनोज जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिका त्याने केली. गुजरातमध्ये पकडलेल्या १३०० किलो इफे ड्रीन प्रकरणातही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. ड्रग्जचा काळा पैसा विकीने कशा प्रकारे स्वीकारला, याची माहिती जयमुखीने दिली होती. तीच माहिती आता किशोरनेही दिल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. व्हॉट्सअ‍ॅप संभाषणालाही दुजोराममता कुलकर्णी, किशोर राठोड, विकी गोस्वामी यांच्यात झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप संभाषणालाही किशोरने दुजोरा दिला.सोलापुरातून इफेड्रीनचा नेमका किती माल कंपनीतून बाहेर काढला? विकी, जयमुखी आणि किशोर यांच्यात कुठे आणि कशा प्रकारे तस्करीची बोलणी झाली. विकीने मालावर प्रक्रिया कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे केली, याची माहिती किशोरकडून गुजरात येथून सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक विजय उपाळे यांचे पथक घेत आहे. किशोरचा साथीदार भारत याच्याकडूनही अशाच प्रकारे सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीतून इतर तपशिलाची माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.