शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्यावर मोक्का लावणार

By admin | Updated: August 9, 2014 23:13 IST

अत्यंत निर्दयी आणि अल्पवयातच पुणो आणि नगर जिल्ह्यांत दरोडे टाकणारा कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळेवर मोक्का लावण्याचा विचार सुरू आह़े

नारायणगाव : अत्यंत निर्दयी आणि अल्पवयातच पुणो आणि नगर जिल्ह्यांत  दरोडे टाकणारा कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळेवर मोक्का लावण्याचा विचार  सुरू आह़े  
दरोडेखोर काळे हा पकडला गेला नसता तर पुणो व नगर जिल्ह्यांत दरोडे टाकून त्याने धुमाकूळ घातला असता आणि अनेकांना प्राण गमवावे लागले असते अशी माहिती पुणो ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार तसेच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली़ बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळे (रा़  कोळगाव, ता़  श्रीगोंदा, जि.नगर) याला पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या पथकाने सापळा रचून भोसरी येथील एमआयडीसीमध्ये अटक केली होती़ नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कोतवाडी आणि पुण्यातील  शिक्रापूर या तीनही ठिकाणांवरील दरोडय़ात बाब्या डबक याने खून केलेले आहेत़  बाब्या डबक हा दरोडे टाकल्यानंतर वेशभूषा बदलून नातेवाइकांकडे राहत अस़े तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणचा पोलिसांना समजून येत नव्हता़ पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर बाब्या ऊर्फ डबक काळे हा भोसरी येथे एका नातेवाइकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली़  त्यानंतर पोलिसांनी  भोसरी येथे सापळा रचून त्यास अटक केली़
बाब्या काळे ऊर्फ डबक काळे व त्याचे साथीदार कोळगाव येथील डोंगररांगेमध्ये जंगलात राहत असत व दरोडे टाकण्यासाठी रात्रीच्या वेळेस जंगलातून बाहेर पडत असत.़  दरोडे टाकल्यानंतर पळून जाण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरून व मोटारसायकल कोणी ओळखू नये म्हणून ती नदी, धरण, विहिरीमध्ये टाकून देत व पुन्हा डोंगरामध्ये झाडीत जाऊन राहत, अशी माहिती त्यांनी तपासात दिली़(वार्ताहर)
 
लहान वयातच सराईत गुन्हेगार
बाब्या ऊर्फ डबक काळे हा लहान वयातच दरोडे टाकण्यात सराईत झाला होता़ त्याची शरीरयष्टी अत्यंत सडपातळ आहे, कोणीही पाहिल्यास तो सराईत आणि निर्दयी दरोडेखोर आहे असे कोणासही वाटणार नाही़ ज्या ठिकाणी दरोडे टाकण्यासाठी तो जातो तिथे दरवाजा दगडाने फोडून आतमध्ये प्रवेश करत अस़े घरातील कोणी जागा झाला किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर बाब्या डबक हा त्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून त्याचा खून करीत अस़े  बाब्या डबकने बेळवंडी येथील दरोडय़ात दोन जणांचा खून केला आह़े