शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र नगरसेवकांना दिलासा नाही

By admin | Updated: January 21, 2017 05:45 IST

निवडणूक आयोगापुढे सादर न केल्याने निलंबित करण्यात आलेल्या सोलापूरच्या १४ नगरसेवकांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

मुंबई : निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा लेखाजोखा निवडणूक आयोगापुढे सादर न केल्याने निलंबित करण्यात आलेल्या सोलापूरच्या १४ नगरसेवकांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे हे सर्व नगरसेवक निवडणूक लढण्यापासून वंचित राहणार आहेत. वीणाताई महादेव देवकाते या सोलापूर महापालिकेची २०१२ची निवडणूक लढवत होत्या.मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. निवडणूक संपल्यानंतर एक महिन्यात निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाचा लेखाजोखा निवडणूक आयोगापुढे मांडणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र वीणाताई देवकाते यांनी या खर्चाची माहिती निवडणूक आयोगाला सादर न केल्याने १० जुलै २०१३ रोजी विभागीय आयुक्तांनी त्यांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले. विभागीय आयुक्तांच्या या आदेशाला वीणाताई देवकाते यांच्यासह १४ जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे की नाही? तसेच आयुक्तांनी प्रत्यक्षात आदेश दिला त्या दिवसापासून, की तो आदेश राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला, त्या दिवसापासून अपात्र केल्याची तीन वर्षे ग्राह्य धरायची, असे प्रश्न याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. खंडपीठाने या दोन्ही मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी अंतिम सुनावणीची आवश्यकता आहे, असे म्हणत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.याचिकेनुसार, देवकाते यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा हिशेब दरदिवशी आयोगापुढे सादर केला होता. मात्र निवडणूक झाल्यावर एकूण खर्चाची रक्कम आयोगापुढे सादर केली नाही. यासंदर्भात आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आणि त्याला देवकाते यांनी उत्तर दिले. त्यानंतर आयोगाने त्यांच्याकडे कधीच विचारणा केली नाही. मात्र १० जुलै २०१३ रोजी विभागीय आयुक्तांनी त्यांना थेट तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. २०१४ मध्ये राजपत्रात नमूद करण्यात आले. मात्र याबद्दलची माहिती देवकाते यांना २०१६ मध्ये एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून समजली. आयोगाने बाजू न ऐकताच एकतर्फी निर्णय घेतल्याने तो बेकायदेशीर आहे. (प्रतिनिधी) ।निवडणुकीनंतर खर्चाची रक्कम सादर केली नाहीवीणादेवी देवकाते यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा हिशेब दरदिवशी आयोगापुढे सादर केला होता. मात्र निवडणूक झाल्यावर एकूण खर्चाची रक्कम आयोगापुढे सादर केली नाही. त्यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात सोलापूरच्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत संबंधित नगरसेवक भाग घेऊ शकत नाहीत.